एक्स्प्लोर
भारतात लवकरच शाओमीचा रेडमी 3s

नवी दिल्लीः शाओमीने चीनमध्ये रेडमी 3s हा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन लाँच केला आहे. रेडमी 3s लवकरच भारतात आणण्याची तयारी शाओमी करत आहे. हा फोन रेडमी 3 या फोनचं अपग्रेडेड व्हर्जन असेल, असं सांगितलं जात आहे. रेडमी 3s मेटल बॉडी फिंगरप्रिंट सेंसर पीस आहे. चीनमध्ये या फोनचे दोन व्हर्जन लाँच करण्यात आले आहेत. 2GB रॅम असणाऱ्या व्हर्जनची किंमत 7 हजार रुपये आहे, तर 3GB रॅम असणाऱ्या व्हर्जनची किंमत 9 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. काय असतील फीचर्स?
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 2 आणि 3GB रॅमचे पर्याय
- 1.1GHz ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
- फिंगरप्रिंट सेंसर
- 13/5 मेगापिक्सेल कॅमेरा
आणखी वाचा























