एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाओमी Mi 5s स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम, 256 जीबी मेमरी; फीचर लीक
मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचा Mi 5 हा स्मार्टफोन बराच लोकप्रिय झाला. नुकतंच या स्मार्टफोनच्या किंमतीत कपातही करण्यात आली. आता शाओमी Mi 5s हे अपग्रेडेड व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनबाबत बरीच माहिती लीक झाली आहे.
अॅड्रॉईडप्योरडॉटकॉमच्या बातमीनुसार, Mi 5s हा mi 5 प्रमाणेच असणार आहे. या स्मार्टफोनचा एक स्क्रीनशॉट लीक झाला आहे.
या कथित स्क्रीनशॉटमुळे या फोनचं स्पेसिफिकेशन आणि इतर फीचर्सचा खुलासा झाला आहे. यामध्ये 3डी टच सपोर्ट आणि 5.15 इंच डिस्प्ले असेल. यामध्ये 2.4 गीगाहर्त्झ स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तब्बल 6 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.
या स्मार्टफोनमध्ये ड्युल टोन एलईडी फ्लॅश असून यामध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, 4जी, आणि ब्ल्यूटूथ यासारखे फीचरही आहेत. यामध्ये 3490 mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement