एक्स्प्लोर
13 एप्रिलपासून शाओमीच्या Mi 5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅश सेल

मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी Mi 5 चा दुसरा फ्लॅश सेल 13 एप्रिलपासून सुरु होणार आहे. दुसऱ्या फ्लॅश सेलसाठी Mi स्टोअरवर रजिस्ट्रेशनही सुरु झालं आहे. हा स्मार्टफोन फक्त mi.com वरच उपलब्ध असणार आहे. याची विक्री कंपनीच्या वेबसाइटवर 13 एप्रिलपासून दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. मागील सेलप्रमाणेच यंदाही अवघ्या काही सेंकदातच या स्मार्टफोनची विक्री होईल असा अंदाज आहे. हा फोन कंपनीचा सर्वात महाग आणि प्रीमियम स्मार्टफोन आहे. याच्या ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत 24,999 रु. आहे. Mi 5 चे खास फिचर्स: 5.5 इंच फूल एचडी स्क्रिन, रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 4 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा 3000 mAh बॅटरी क्षमता ४जी, ब्ल्यूटूथ, यूएसबी टाइप-C आणि इतरही ऑप्शन देणयात आले आहेत.
आणखी वाचा























