एक्स्प्लोर
शाओमीचा वर्धापन दिन, Redmi 4A एक रुपयात खरेदी करण्याची संधी
तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शाओमीचे काही खास ग्राहक रेड मी A4 हा स्मार्टफोन केवळ एक रुपयात खरेदी करु शकतात. रेड मी स्मार्टफोन्सची विक्री आज (20 जुलै)दुपारी 12 वाजता सुरु झाली.
मुंबई : शाओमीचा भारतात तिसरा वर्धापन दिन आहे. यानिमित्त कंपनीने 20 ते 21 जुलै दरम्यान खास सेलचं आयोजन केलं आहे. नुकताच लाँच झालेला Mi Max 2 आज पहिल्यांदाच Mi इंडियाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात शाओमीने Mi Max 2 च्या खास सेलची घोषणा केली होती. विशेष म्हणजे रेड मी A4, रेड मी नोट आणि रेड मी 4 हे सर्व स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असतील. तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शाओमीचे काही खास ग्राहक रेड मी A4 हा स्मार्टफोन केवळ एक रुपयात खरेदी करु शकतात. रेड मी स्मार्टफोन्सची विक्री आज (20 जुलै)दुपारी 12 वाजता सुरु झाली.
रेडमी A4 एक रुपयात कसा खरेदी कराल?
रेड मी A4 एक रुपयात खरेदी करण्यासाठी तुम्हाला mi.com/in या वेबसाईटवर लॉग ऑल करावं लागेल. वेबसाईटच्या होम पेजवरच तुम्हाला हा फोन एक रुपयात खरेदी करण्याचा पर्याय दिसेल. यानंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक आयडीने वेबसाईटवर साईन इन करावं लागेल. नोंदणी केल्यानंतर हा सेल फेसबुक पेजवर शेअर करावा लागेल. सेलसाठी तुमची नोंदणी झाल्यानंतर सकाळी 11, दुपारी 1, 2, 4 आणि सायंकाळी 6 आणि रात्री 8 वाजता हा फोन एक रुपयात खरेदी करण्याची संधी मिळेल.
इतर वस्तूंवरही सूट
स्मार्टफोनसोबत शाओमीच्या इतर उत्पादनांवरही सूट दिली जात आहे. यामध्ये ईयरफोन्स आणि पॉवर बँकचा समावेश आहे. 10000mAh क्षमतेची पॉवर बँक, 1 हजार 199 रुपयांना, तर 20000mAh क्षमतेची पॉवर बँक 2 हजार 199 रुपयांना उपलब्ध आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement