(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Electric Cruise Ship: जगातील सर्वात मोठं इलेक्ट्रिक क्रूझ जहाज चीनमध्ये रवाना; एका चार्जमध्ये गाठणार 100 किमीचं अंतर
Electric Cruise Ship: चीनमध्ये विकसित करण्यात आलेले जगातील सर्वात मोठं इलेक्ट्रिक क्रुझ जहाजानं मंगळवारी पहिला प्रवास केलाय.
Electric Cruise Ship: चीनमध्ये विकसित करण्यात आलेले जगातील सर्वात मोठं इलेक्ट्रिक क्रुझ जहाजानं मंगळवारी पहिला प्रवास केलाय. सागरी इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजरपेठाचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी या जहाजाची निर्मिती करण्यात आली होती. थ्री गॉर्जेस कॉर्पोरेशन आणि हुबेई थ्री गॉर्जेस टुरिझम ग्रुपची उपकंपनी असलेल्या चायना यांगत्झे पॉवर कंपनीनं या जहाजाला विकसित केलं आहे. दरम्यान, पहिला प्रवास करण्यापूर्वी या जहाजाची जानेवारी महिन्यात अनेक चाचण्या करण्यात आल्या होत्या.
चीनमधील यांगत्झे पॉवर कंपनीनं 2017 मध्ये या जाहजाचं लॉन्चिग केलं होतं. त्यानंतर या इलेक्ट्रिक जहाजाबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर मंगळवारी या इलेक्ट्रिक जहाजानं आपला पहिला प्रवास केला. एकावेळी 1 हजार 300 प्रवाशांना घेऊन जाण्याची या इलेक्ट्रिक जहाजाची क्षमता आहे. महत्वाचं म्हणजे, एका चार्जवर हे इलेक्ट्रिक जहाज 100 किलोमीटर अंतर कापू शकतं, ही या जहाजाची खासियत आहे. 23.5 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीसह बांधलेल्या या जहाजात स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आहे.
इलेक्ट्रिक कारसाठी जगातील पहिल्या क्रमांकाची बॅटरी उत्पादक कंपनी, कंटेम्पररी अँपेरेक्स टेक्नॉलॉजी कडून प्रचंड 7,500 किलोवॅट-तास सागरी बॅटरीद्वारे समर्थित आहे. हे जहाज पुढील महिन्यापासून व्यावसायिक ऑपरेशन्समध्ये जाईल. मुख्यतः प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींसाठी वापरले जाईल. या इलेट्रिक वाहनातून प्रवास करण्यासाठी अनेकजण उस्तुक आहेत. यानंतर इलेक्ट्रिक जहाजाच्या निर्मितीवर अधिक भर दिला जात आहे.
हे देखील वाचा-
- पहिल्यांदाच इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आले 'हे' फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
- Electric Car: देशात सर्वाधिक विक्री होणारी 'ही' इलेक्ट्रिक कार महागली, जाणून घ्या नवीन किंमत
- पॉवरफुल मोटर अन् अॅडवान्स बॅटरी; भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha