एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता उठ-सूट कोणीही तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करु शकत नाही, 'हे' आहे नवं फीचर
अधिकाधिक युजर फ्रेन्डली होण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने नवे फिचर्स आणले जात आहेत. त्यामध्ये बदल केले जात आहेत. आता व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे.
मुंबई : अधिकाधिक युजर फ्रेन्डली होण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने नवे फीचर्स आणले जात आहेत. त्यामध्ये बदल केले जात आहेत. उठ-सूट कोणीही आपल्याला व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये अॅड करतो. त्यामुळे अनेकजण वैतागलेले आहेत. परंतु आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. व्हॉट्सअॅपने त्यासाठी नवे फीचर आणले आहे.
आपल्याला आपल्या परवानगीशिवाय कोणीही कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करतो, त्याचा अनेकांना खूप त्रास होतो. विशेषतः महिलांना यामुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. महिलांना त्यांच्या परवानगीशिवाय एखाद्या ग्रुपमध्ये अॅड करून त्या ग्रुप्समध्ये अश्लील मेसेजेस, फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलीस स्थानकांमध्ये अनेकदा तक्रारीदेखील दाखल झालेल्या आहेत. या सर्व प्रकारांमधून बोध घेत व्हॉट्सअॅपने ग्रुप्स प्रायव्हसीचं नवीन फीचर आणलं आहे.
सुरुवातीला काही लोकांच्या मोबाईलवर हे फीचर प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होईल.
या फिचरचा वापर कसा करायचा?
1. प्ले स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा
2. व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जाऊन अकाऊंट्सवर क्लिक करा
3. अकाऊंट्समध्ये प्रायव्हसीमध्ये जा, तिथे ग्रुप्स असा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा
4. ग्रुप्सवर क्लिक केल्यावर तीन ऑप्शन्स दिसतील, a)एव्हरीवन, b)माय कॉन्टॅक्टस आणि c)नोबडी
a)एव्हरीवन : जर तुम्हाला केवळ तुमच्या ओळखीच्या लोकांनीच कोणत्याही ग्रुप्समध्ये अॅड करावं, असं वाटत असेल तर माय कॉन्टॅक्ट्स हा ऑप्शन सिलेक्ट करा
b)माय कॉन्टॅक्टस : तुम्हाला कोणीही ग्रुप्समध्ये अॅड करु नये, असे वाटत असेल तर नोबडी हा ऑप्शन सिलेक्ट करा
c)नोबडी : तुम्हाला कोणीही कोणत्याही ग्रुप्समध्ये अॅड करावे, असे वाटत असेल तर एव्हरीवन हा ऑप्शन सिलेक्ट करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement