एक्स्प्लोर
‘जिओ फोन-2‘मध्ये व्हॉट्सअॅपसाठी वाट पाहावी लागणार
गेल्या महिन्यातच रिलायन्सने 41 व्या वार्षिक सर्वसाधार बैठकीत ‘जिओ फोन-2’ लॉन्च केले होते. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या फोनचं अपडेट व्हर्जन म्हणजे ‘जिओ फोन-2’.

मुंबई : जिओच्या नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नव्या जिओ फोनच्या पहिल्या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. गेल्या महिन्यातच रिलायन्सने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ‘जिओ फोन-2’ लॉन्च केला होता. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या फोनचं अपडेट व्हर्जन म्हणजे ‘जिओ फोन-2’. लॉन्चिंगवेळी जिओकडून सांगण्यात आले होते की, नवा फोन व्हॉट्सअॅप आणि यूट्यूब अॅप सपोर्ट करेल. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. व्हॉट्सअॅपसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. यूट्यूब अॅप मात्र जिओ स्टोअरमध्ये देण्यात आलं आहे. त्यामुळे यूजर्स तेथून यूट्यूब डाऊनलोड करु शकतात. नव्या अपडेटनंतर तर यूट्यूब थेट फोनमध्येच उपलब्ध असेल. वेगळं डाऊनलोड करावं लागणार नाही. फीचर्स :
- 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले
- 512 एमबी रॅम
- 4 जीबी स्टोरेज
- मायक्रो एसडीच्या सहय्याने 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवणं शक्य
- 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- VGA फ्रंट कॅमेरा
- कमांडसाठी डेडिकेशन बटनची सुविधा
- कनेक्टिव्हिटी - 4जी VoLte, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी, एफएम रेडिओ
- 2000mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा























