एक्स्प्लोर
व्हॉईस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
कॉल उचलल्यावर व्हॉइस कॉल अचानक व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच होणार नाही. समोरच्या व्यक्तीने रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली, तरच व्हिडिओ कॉल सुरु होऊ शकेल.
मुंबई : व्हॉट्सअॅपशिवाय स्मार्टफोन यूझर्सचं पानही हलत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वाधिक वापरलं जाणारं हे चॅटिंग अॅप सतत नवनवीन फीचर्स आपल्या यूझर्सना देत असतं. आता व्हॉट्सअॅपने व्हॉईस कॉलवरुन व्हिडिओ कॉलवर स्वीच करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
व्हॉट्सअॅपवर व्हॉईस कॉल सुरु असताना तुम्हाला व्हिडिओ कॉलवर स्वीच करता येणार आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी व्हॉईस कॉलवर बोलत असाल, आणि तुम्हाला त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायची इच्छा असेल, तर तुमच्या स्क्रीनवर असलेलं 'क्वीक' हे बटन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट समोरच्या यूझरला जाईल. त्याने ती स्वीकारल्यास तुमचा कॉल व्हॉईसवरुन व्हिडिओ कॉलवर स्वीच होईल.
विशेष म्हणजे, कॉल उचलल्यावर व्हॉइस कॉल अचानक व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच होणार नाही. समोरच्या व्यक्तीने रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली, तरच व्हिडिओ कॉल सुरु होऊ शकेल.
अँड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर हे अपडेट पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपकडून या नव्या फीचरची चाचपणी सुरु होती. सध्या फक्त बीटा 2.18.4 व्हर्जनसाठी ही सुविधा सुरु आहे. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे.
रेकॉर्ड व्हॉईस कॉल
व्हॉईस मेसेजसाठी व्हॉट्सअॅप एक नवं फीचर आणत आहे. फोन कॉल सुरु असताना किंवा संपल्यावर एक ऑप्शन यूझरला दिसेल. कॉलवर बोलायचं किंवा कॉल रेकॉर्ड करायचा, याची निवड यूझरला करता येणार आहे. त्यामुळे रेकॉर्ड झालेला व्हॉईस कॉल नंतरही ऐकता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement