एक्स्प्लोर
Advertisement
व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणते मेसेजेस पाठवले जाणार, हे आता अॅडमिन ठरवणार
सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिन कोणते मेसेजेस ग्रुपमध्ये पाठवले जाणार यावर कंट्रोल ठेवू शकणार आहे.
मुंबई : व्हॉट्सअपने आपल्या यूजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरमुळे अॅडमिनच्या अधिकारांत वाढ झाली आहे. कारण नव्या फीचरमुळे यापुढे अॅडमिनच्या परवानगीशिवाय मेम्बर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत.
हे नवं फीचर अँड्रॉईड बीटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये देण्यात आलं आहे.
ग्रुप सेटिंगमध्ये गेल्यावर अॅडमिनला हे फीचर उपलब्ध असेल. सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिन कोणते मेसेजेस ग्रुपमध्ये पाठवले जाणार यावर कंट्रोल ठेवू शकणार आहे.
या फीचरच्या माध्यमातून ग्रुप चॅटिंग अधिक चांगली व्हावी, असा व्हॉट्सअपचा हेतू आहे. कारण ग्रुपमध्ये अनेकदा वादग्रस्त मेसेजेस पाठवले जातात. काही मेसेजेसमुळे अशांतता पसरण्याचीही शक्यता असते. यावरच उपाय म्हणून व्हॉट्सअपने हे फीचर आणलं आहे.
हे नवं फीचर सध्या आयवोएसच्या स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर अँड्रॉईड आणि विन्डोजमध्ये उपलब्ध होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement