वोडाफोनचा अनलिमिटेड 169 रुपयांचा प्लान
वोडाफोनच्या ग्राहकांना 28 दिवसांनंतर मिनिमम रिचार्ज करणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा त्यांच्या नंबरवरी इनकमिंग आणि आऊटगोईंग सुविधा बंद होणार आहे.
नवी दिल्ली : एअरटेलनंतर आता वोडाफोननेही 169 रुपयांचा प्लान आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. एअरटेलच्या 169 प्लानप्रमाणेच वोडाफोनच्या 169 प्लानमध्ये फायदे मिळणार आहेत. वोडाफोनच्या 169 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1 जीबी इंटरनेट प्रतिदिन आणि 100 एसएमएस प्रतिदिन मिळणार आहेत. या प्लानची वैधता 28 दिवसांची असणार आहे.
वोडाफोनच्या प्रीपेड युजर्सना या प्लानची सुविधा मिळणार आहे. वोडाफोनने काही दिवसांपूर्वीच आपल्या मिनिमम प्लानची घोषणा केली होती. त्यामध्ये या 169 रुपयाच्या प्लानचा समावेश होता. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, असं असलं तरी प्रतिदिन व्हॉईस कॉलिंगला लिमिट देण्यात आलं आहे. यामध्ये कॉलिंगला प्रतिदिन 250 मिनिट आणि दर आठवड्याला 1000 मिनिट लिमिट असणार आहेत.
तर 28 दिवस दररोज 1 जीबी इंटरनेट आणि 100 एसएमएस मिळणार आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, चेन्नई, कर्नाटक यांसह विविध सर्कलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. (वोडाफोनच्या अधिकृत वेबसाईटवर एकदा तपासून पाहावे.)
वोडाफोनच्या ग्राहकांना 28 दिवसांनंतर मिनिमम रिचार्ज करणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा त्यांच्या नंबरवरी इनकमिंग आणि आऊटगोईंग सुविधा बंद होणार आहे.