Hotstar : 151 रुपयांत मनोरंजनाचा जबरदस्त धमाका; वोडाफोन अन् आयडियाच्या 'या' प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार मिळणार फ्री!
151 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे.
Hotstar : टेलिकॉम कंपनी वोडाफोन (Vodafone) आणि आयडियानं (Idea) त्यांच्या युझर्ससाठी प्रीपेड प्लॅनमध्ये एक खास ऑफिर ठेवली आहे. या कंपन्यांनी त्यांच्या 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवस असणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 8 जीबी डेटा देणार आहे. या प्लॅनमध्ये फक्त कॉलिंग आणि फ्री एसएमएस यांसारख्या सुविधा मिळणार नाहीत.
या प्लॅनमध्ये देखील डिज्नी प्लस हॉटस्टार मिळणार फ्री
तुम्हाला अधिक डेटासह डिज्नी प्लस हॉटस्टार मोफत पाहिजे असेल तर 399 रुपयांच्या रिचार्जचा प्लॅन तुम्ही घेऊ शकता. सर्वोत्तम आहे. या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 28 दिवसांची वैधता देते. त्यात दररोज 20.5 जीबी डेटा तुम्हाला मिळेल. कंपनी प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. कंपनी या प्लॅनच्या सदस्यांना तीन महिन्यांसाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईलवर मोफत देत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.
499 रुपयांचा प्लॅन
499 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईलच्या मोफत सबस्क्रिप्शन ऑफर कंपनी देत आहे. या प्लॅनचे सदस्यत्व घेऊन, तुम्ही एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मोफत पाहू शकता. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटा देत आहे. यामध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील.
प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इतर सुविधा
399 आणि 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त सुविधा आहेत. Binge ऑल नाईट बेनिफिट्स या सुविधेमध्ये 12 AM ते 6 AM पर्यंत अमर्यादित डेटा मिळतो. दोन्ही प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओवर ही सुविधा देखील मिळणार आहे. तसेच दोन्ही प्लॅन्समध्ये Vi movies and TV या अॅप्सचा फ्री एक्ससेस देखील युझरला मिळणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :