एक्स्प्लोर

चेंजिंग रुममधील आरशाचं सत्य कसं पडताळाल?

मुंबई : शॉपिंग ही महिलांची सर्वात आवडती गोष्ट. खरेदीसाठी अनेक महिला, तरुणी मॉल किंवा दुकानात जातात. कपडे व्यवस्थित आहेत की नाही हे पाहण्यासाठी ट्रायल रुममध्ये जातात. पण केंद्रीय मंत्री मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत फॅब इंडियामध्ये घडलेल्या प्रकारानंतर, आता अनेक महिलांना चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा तर नसेल ना अशी भीती असते.   मात्र ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा किंवा तिथल्या आरशामागे तिसरंच नाही ना जे तुमच्यावर नजर ठेवून आहे, हे हातांच्या बोटांनी तपासता येऊ शकतं.   केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एक वर्षापूर्वी गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरुममध्ये शॉपिंगसाठी गेल्या होत्या. शोरुमच्या ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं त्यांनी उजेडात आणलं होतं. स्मृती इराणींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर देशात खळबळ माजली होती. पण मॉल किंवा दुकानाच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याची घटना समोर येण्याची ही पहिली वेळ नाही.   सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दावा केला आहे की, बोट आरशावर ठेवलं की चेंजिंग रुममध्ये केवळ आरसा आहे की दुसऱ्या बाजूने तुम्हाला कोणी पाहत आहे, हे समजू शकेल. इतकंच नाही तर तो आरसाच आहे कसं ओळखावं याची पद्धतही सांगितली आहे.   कसा ओळखाल फरक? चेंजिंग रुममध्ये गेल्यावर महिलांनी कपडे बदलण्याआधी आरशावर बोट ठेवून पडताळणी करावी. आरशावर बोट ठेवल्यावर खऱ्या बोटामध्ये आणि प्रतिबिंबामध्ये गॅप दिसत असेल, तर आरसा योग्य आहे. मात्र बोट आणि आरशात दिसत असलेल्या बोटात गॅप दिसला नाही तर समजा की आरशामध्ये गडबड आहे.     व्हायरल फोटोचं सत्य Fingure_Mirror व्हायरल होत असलेल्या या फोटोचं सत्य जाणण्याचा प्रयत्न एबीपीने केला. यासंदर्भात डिटेक्टिव्ह संजीव देशपाल यांचा सल्ला घेतला. वन वे आणि टू वे मिरर काय असतं आणि तो कसा ओळखावा हे त्यांनी समजावलं.   संजीव देशपाल यांच्या माहितीनुसार, "आरशावर बोट किंवा बोटाचं नख ठेवून पाहा. जर बोट आणि आरशात दिसणारं बोट यांच्यात काही गॅप दिसला तर तो सामान्य आरसा आहे. पण बोट आणि त्याच्या प्रतिबिंबामध्ये गॅप नसेल तर याचा अर्थ आरसा सामान्य नाही. आरशाच्या दुसऱ्या बाजूने तुम्हाला पाहिलं जात आहे. पण कधीतरी हा गॅप एवढा कमी असतो की आरसा खरा आहे की त्यात छेडछाड केली आहे, हे ओळखणं कठीण होतं. अशा परिस्थितीत जर महिलांना आरशामध्ये गडबड असल्याची शंका आली तर त्यांनी तातडीने ती चेंजिंग रुम सोडावी.   त्यामुळे एबीपीच्या पडताळणीत व्हायरल होत असलेला हा फोटो सत्य आहे.   पाहा व्हिडीओ  

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget