WhatsApp without internet: भन्नाटच! व्हॉट्सअॅपवर इंटरनेटशिवाय करा बिंधास्त चॅटिंग
WhatsApp without internet: यूजर्सला चॅटिंगमध्ये नवीन अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असते.
WhatsApp without internet: यूजर्सला चॅटिंगमध्ये नवीन अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असते. आता कंपनी यूजर्ससाठी एक हटके फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. यूजर्स आता इंटरनेटशिवाय या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. व्हॉट्सअॅप ने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक अपडेट जोडले आहे, ज्यानंतर युजर्स इंटरनेटशिवाय देखील व्हॉट्सअॅप वापरू शकतील. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने व्हॉट्सअॅप युजर्स इंटरनेटशिवायही कनेक्टेड राहू शकणार आहेत.
प्रॉक्सी नेटवर्कशी (WhatsApp Proxy Setting) कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला Use Proxy च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल. काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही मेसेज पाठवू शकत नसाल, तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशात, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.
कसं वापरलं हे फिचर -
व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये नवीन फिचर असेल. त्याासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. व्हॉट्सअॅप म्हणते, जर तुमच्याकडे इंटरनेट एक्सेस असेल, तर सोशल मीडिया या सर्च इंजिनवर सुरक्षित प्रॉक्सी सोर्स शोधू शकता. पॉक्सी नेटवर्क कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला WhatsApp Setting मध्ये जावं लागेल. तिथं तुम्हाला Storage and Data हा पर्याया मिळेल. त्यानंतर तुम्हाला Proxy च्या पर्यायावर क्लीक करावं लागेल. त्यानंतर Use Proxy या पर्यायावर क्लिक करा... Proxy Address टाकून सेव्ह करावं लागेल. अशापद्धतीनं तुम्ही नेटचवर्कचा वापर करु शकता. जर कनेक्शन फेल झालं तर तुम्हाला चेकमार्क दिसेल. जर तुम्ही प्रॉक्सी कनेक्ट केल्यानंतरही मेसेज पाठवू शकत नाहीत, अथवा मिळत नाहीत तर प्रॉक्सीला ब्लॉक केलेलं असू शकतं. अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन प्रॉक्सी नेटवर्क वापरावं लागेल.
We continue to fight for your right to communicate freely and privately.
— WhatsApp (@WhatsApp) January 5, 2023
Now, when connecting to WhatsApp directly is not possible, you can stay connected around the world through a server set up by volunteers and organizations dedicated to helping others communicate freely.
हे फीचर देखील लाँच -
गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपनं नवीन फीचर आणलं होतं. त्यामध्ये चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO केले जाऊ शकतात. WhatsApp ने 'Accidental delete' या नावाने फीचर आणलं होतं. त्याशिवाय गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने भारतात 'मेसेज युवर सेल्फ' फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. या फीचरमध्ये नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वतःचा नंबर मेसेज करण्याची सुविधा देते. या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.