एक्स्प्लोर
ब्लूमबर्ग-ट्विटर एकत्र, लवकरच नवं न्यूज चॅनेल
वॉशिंग्टन : ब्लूमबर्गच्या सहकार्याने ट्विटर एक नवीन वृत्तवाहिनी सुरु करण्याच्या तयारीत आहे. हे नवीन चॅनेल सोशल माडियातील व्हिडीओचा वापर वाढवेल, असा दोन्ही कंपनींचा विश्वास आहे.
या दोन्ही कंपन्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. हे नवं चॅनेल ब्लूमबर्गच्या वैश्विक संपादकीय आणि बातम्यांच्या संकलन क्षमतेला ट्विटरचं डिजिटल बळ पुरवेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.
आर्थिक बातम्यांचे विश्लेषक आणि माहिती सेवेचे संस्थापक तसेच न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग आणि ट्विटरचे विशेष कार्यकारी अधिकारी जॅक डोरेस यांनी याची घोषणा केली. या वर्षाच्या शेवटी हे नवीन चॅनेल लॉन्च होईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
ब्लूमबर्गचे सीईओ जस्टिन स्मिथ यांनी सांगितलं की,'' सध्या जे उपलब्ध आहे, त्याला वाचकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण यापेक्षा उत्तम बातम्या मिळाव्यात, अशी वाचकांची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळातही त्याची सर्वाधिक गरज आहे.''
तर ट्विटरचे सीओओ अॅन्थनी नोटो यांनी सांगितलं की, ''सध्या ट्विटरचा वेग पाहता, ब्लूमबर्गच्या उत्तम संपादकीय आणि बातम्यांच्या संकलनाची जोड मिळाली, तर ट्विटरचा विस्तार आणखी झपाट्याने वाढेल.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement