एक्स्प्लोर

सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' अॅप्स आहेत? तर, तात्काळ डिलिट करा, अन्यथा...

सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट्सकडून गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही खतरनाक अॅप्सबाबत माहिती शोधली आहे. हे अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ती तात्काळ अनइन्स्टॉल करा, अशा सूचना सायबर तज्ञांनी दिल्या आहेत.

मुंबई: सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट्सकडून गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही खतरनाक अॅप्सबाबत माहिती शोधली आहे. जोकर मालवेअर या व्हायरसमुळं आपल्या मोबाईल डेटाची चोरी होऊ शकते तसंच आर्थिक फटकाही बसू शकतो. या व्हायरसशी संबंधित अॅप्स जवळपास दोन लाख वेळा डाऊनलोड केली गेली आहेत. एका रिपोर्टनुसार यात कनविनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी अॅपलॉक, पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सेपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्स अशा अॅप्सचा समावेश आहे. असे अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ती तात्काळ अनइन्स्टॉल करा, अशा सूचना सायबर तज्ञांनी दिल्या आहेत.

रिपोर्टनुसार अशा अॅप्सला गूगल प्ले स्टोअरवरुन काढलं आहे मात्र आणखी काही स्मार्टफोन्समध्ये हे अॅप आहेत. त्यांनी तात्काळ डिलिट करावेत, असा सल्ला दिला आहे. जोकर मालवेअर फोनमध्ये आल्यानंतर यूजर्सला प्रीमियम सर्व्हिससाठी काहीही माहिती नसताना सब्सक्राइब केलं जातं. याआधी 2017 साठी गूगलनं प्ले स्टोअरवरुन अशी 1700 अॅप्स हटवले आहेत. मात्र असे अॅप्स दुसऱ्या रुपात प्ले स्टोअरवर येत राहतात.

सावधान...! ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरता मोबाईल ॲप्सचा वापर घातक

हे अॅप्स तुमच्या मोबाइल मधील अँड्रॉईड अॅप वर हल्ला करत असून तुमच्या बँक खात्याची माहिती तर चोरत आहे. सोबतचं तुमचा खाजगी डेटासुद्धा चोरत आहे. सायबर विभागामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जोकर नावाचा वायरस आता तुमच्या मोबाईलमध्ये शिरू शकतो आणि तुमच्या नकळत तुमचा डेटा आणि तुमचा बँक अकाउंट लांब कुठेतरी बसलेल्या हॅकर जवळ सहज पोचू शकतो आणि याची तुम्हाला कल्पनाही लागणार नाही. जोकर व्हायरसमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अकरा अँड्रॉइड ॲप्लिकेशनद्वारे जोकर वायरस आपल्या मोबाइलमध्ये येऊ शकतो.

जोकर.! हा हसवत नाही तर रडवतो; महाराष्ट्र सायबर सेलकडून सावधानतेचा इशारा

कोणतंही अनोळखी अॅप डाऊनलोड करू नका हे अँड्रॉइड ॲप आपण जेव्हा डाउनलोड करतो. तेव्हा यांच्यामध्ये आधीपासून असलेल्या जोकर वायरस आपल्या मोबाईलमध्ये शिरकाव करतो आणि आपल्या मोबाईल मधील महत्त्वाच्या माहितीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मोबाईलवरुन किंवा नेट बँकिंगद्वारे केले जाणाऱ्या सगळ्या ट्रांजक्शनची माहिती लिक होऊ शकते. ज्यामुळे मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून कुठेही ॲप डाऊनलोड करताना एकदा तपासून घ्या आणि अनोळखी नंबरद्वारे आलेला मेसेज किंवा लिंक आणि मेलवर क्लिक करू नका, असा सल्ला सायबर तज्ञांनी दिला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..

व्हिडीओ

Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
Ruturaj Gaikwad: मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदी 2477 रुपयांनी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं आणि चांदी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचा दर काय? 
Beed Crime News: माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता; जीवघेणा हल्ला झालेल्या PAचा दावा; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, नेमकं प्रकरण काय?
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता; जीवघेणा हल्ला झालेल्या PAचा दावा; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, नेमकं प्रकरण काय?
Embed widget