'हे' आहेत देशात उपलब्ध असलेले बेस्ट 5G स्मार्टफोन, पाहा संपूर्ण लिस्ट
5G Smartphones Available In India: देशात आता इंटरनेटचा वेग वाढणार असून काही महिन्यात 5 जी सेवा सुरू होणार आहे.
5G Smartphones Available In India: देशात आता इंटरनेटचा वेग वाढणार असून काही महिन्यात 5 जी सेवा सुरू होणार आहे. आज रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा दिवाळीत सुरू होणार असल्याची घोषणा केली. भारती एंटरप्रायझेसचे (Bharti Enterprises) चेअरमन सुनील मित्तल (Sunil Mittal) यांनी ऑक्टोबरपर्यंत Bharti Airtel भारतात 5G सेवा जारी करेल, असं सांगितलं आहे. अशातच आता या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5G फोन असणे ही आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत देशात कोणते 5G फोन लॉन्च झाले आहे. याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आतापर्यंत Xiaomi, Apple, OnePlus, Oppo, Samsung, Realme, Vivo आणि इतर मोबाईल निर्माता कंपन्यांनी भारतात आपले 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहे. यामध्येच 2022 मध्ये लॉन्च झालेलं 5G फोन बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
बेस्ट 5G स्मार्टफोन
- iQOO 9T 5G : 8+128GB - 49,999 रुपये. 12+256GB 54,999 रुपये.
- OnePlus 10 Pro : 8+128GB - 66,999 रुपये. 12+256GB - 71,999 रुपये
- Samsung Galaxy S22 सिरीज : Galaxy S22 8+128GB - 72,999, 8+256GB - 76,999 , Galaxy S22+ 8+128GB - 84,999 , 8+256GB - 88,999 , Galaxy S22 Ultra 12+256GB -1,09,999 , 12+512GB - 1,18,999 रुपये.
- iPhone 13 सिरीज: Apple ने गेल्या वर्षी iPhone 13 लॉन्च केला तेव्हा 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये होती. याच स्टोरेजसाठी iPhone 13 mini ची किंमत 69,900 रुपये आहे. 2020 मधील आयफोन 12 सिरीजप्रमाणेच किंमती सुरू झाल्या होत्या. मात्र आता या फोनची किंमत कमी झाली आहे. iPhone 13 pro ची किंमत 1,19,900 रुपये आहे. तर iPhone 13 Pro Max ची किंमत 1,29,900 रुपये आहे.
- Realme: 8/128GB - 49,999 रुपये. 12/256GB - 57,999 रुपये.
- Samsung Galaxy S21 FE 5G: 8+128GB – 49,999 रुपये. 8+256GB – 53,999 रुपये.
- OnePlus 10R 5G: 8/128GB (80W) – 38,999 रुपये. 12/256GB (80W) – 42,999 रुपये. 12/256GB (150W) – 43,999 रुपये.
- iQOO 9: 8/128GB- 39,990 रुपये. 12/256GB- 43,990 रुपये.
- Realme GT Neo 3: 8GB/128GB - 36,999 (80W)रुपये. 8GB/256GB - 38,999 (80W) रुपये. 12GB/256GB - 42,999 (150W) रुपये.
- iPhone SE 3: 64GB: 43,900 रुपये.
हे आहेत सर्वात स्वस्त 5G फोन
- POCO M4 5G : किंमत 10999 रुपये.
- Redmi Note 10T 5G : किंमत 13999 रुपये.
- Redmi Note 10T 5G : किंमत 11999 रुपये.
- SAMSUNG GALAXY M13 5G : किंमत 14400 रुपये.
- OPPO K10 5G : किंमत 16499 रुपये.