एक्स्प्लोर

Work From Home करताना वारंवार लॅपटॉप हँग होतोय? 'हे' करून पाहा

लॉकडाऊनमुळे अनेकजण Work From Home करत आहेत. अशातच अनेकांना लॅपटॉप किंवा कम्प्युटर हँग होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काही उपाय...

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतात सध्या लॉकडाऊन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु, अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. यादरम्यान, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण सर्वांना उद्भवणारी समस्या म्हणजेच, कम्प्युटर किंवा लॅपटॉप हँग होणं किंवा स्लो चालणं. परंतु, विंडो अपडेट, रॅम अपग्रेड आणि री-स्टार्ट हे करणं म्हणजे, हे तात्पुरते उपाय आहेत.

Restart करणं का आहे आवश्यक?

अनेक युजर्स बरेच दिवस आपला लॅपटॉप रिस्टार्ट करत नाहीत. विंडो 10 मध्ये कम्प्युटर स्वतःहून स्लीप मोडमध्ये जातो. परंतु, जे टास्क तुम्ही बंद करत नाही, ते बॅकग्राउंडमध्ये सुरुच राहतात. असं सतत झाल्यामुळे लॅपटॉप स्लो होतो. त्यामुळे तुमचं काम संपल्यानंतर लॅपटॉप बंद करायला विसरू नका. लॅपटॉप बंद केल्यामुळे बॅकग्राउंडला सुरु असणारे सर्व टास्क बंद होतील.

Update करणंही गरजेचं

कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये काहीना काही एरर येत राहतात. हे एरर सॉल्व करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिम असलेली कंपनी काही अपडेट्स जारी करते. या अपडेट्समार्फत ऑपरेटिंग सिस्टिममध्ये येत असलेले एरर सॉल्व केले जातात. त्यामुळे तुमच्यासाठी सिस्टिम अप टू डेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. विंडोमध्ये अपडेट आलं असेल तर ते चेक करण्यासाठी सेटिंगमध्ये जा आणि अपडेट वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही Check for UpdatesCheck for Updates मार्फत लेटेस्ट अपडेट मिळवू शकता.

जे अॅप्स वापरत नाही ते डिलीट करा

तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये अनेक अॅप्स असतात. कंपन्या नव्या लॅपटॉपसोबत अनेक अॅप्सही देतात ज्यांना Bloatware असं म्हणतात. जर तुमच्याही कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये असे अॅप्स असतील जे तुम्ही वापरत नाही, तर ते डिलीट करा. विंडोजमध्ये Control Panel मध्ये जाऊन तुम्ही Program सिलेक्ट करा आणि जे अॅप डिलीट करायचं असेल त्यावर क्लिक करा. क्लिक करताच तुम्हाला Uninstall चा ऑप्शन मिळेल.

RAM अपग्रेड करा

RAM वाढवल्यामुळे लॅपटॉपच्या सीपडमध्ये फार फरक जाणवतो. 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे लॅपटॉप 4GB रॅमसोबत येतात. जर तुम्हाला मल्टिटास्किंग कामं करायची असतील तर 4GB रॅम पुरेसा नाही. त्यामुळे तुम्हाला रॅम अपग्रेड करणं आवश्यक आहे. अनेक कंपन्या लॅपटॉपमध्ये दोन रॅम स्लॉट देतात. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या स्लॉटमध्ये 4GB किंवा 8GB चा आणखी एक रॅम लावून तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढवू शकता.

SSD चा वापर करा

SSD (Solid State Drives) नवीन प्रकारचं स्टोरेज डिव्हाइस आहे, जे फ्लॅश मेमरीवर काम करतं. SSDमध्ये वापर करण्यात येणारी फ्लॅश मेमरी तंत्रज्ञानामार्फत आधीपासूनच सुरु असणाऱ्या HDD पेक्षा कमी वेळात डाटा एक्सेस केला जाऊ शकतो. SSD ची किंमत HDD च्या तुलनेत अधिक असते. परंतु, तुम्ही ऑपरेटिंग सिस्टिम ड्राइव्हमार्फत SSD चा वापर करून लॅपटॉपचा स्पीड वाढवू शकता. डाटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही HDD पर्याय म्हणून वापरू शकता.

System Maintenance चा वापर करा

विंडो 10 मध्ये लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी System Maintenance चा पर्याय देण्यात आला आहे. System Maintenance मार्फत तुम्ही लॅपटॉपच्या कोणत्याही पार्टमध्ये येत असलेल्या एरर जाणून घेऊ शकता. याव्यतिरिक्त System Maintenance चा वापर कम्प्युटरमधून व्हायरस हटवण्यासाठी केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

मोबाईलमध्ये डार्क मोड वापरताना काळजी घ्या, डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून 'हे' करा

WhatsApp वर एकाच वेळी 50 लोकांना व्हिडीओ कॉल शक्य; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget