एक्स्प्लोर
वोडाफोनचा फ्री अनलिमिटेड कॉल प्लान लाँच!
मुंबई: रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोनही फ्री सेवा देण्याच्या शर्यतीत सामील झालं आहे. वोडाफोननं देशभरात अनलिमिटेड फ्री कॉलिंग प्लान लाँच केला आहे.
प्रीपेड यूजर्ससाठी 144 रुपयांच्या पॅकपासून सुरवात असणार आहे. या पॅकमध्ये देशभरात वोडाफोन टू वोडाफोन फ्री अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. तसेच 500 एमबी डेटाही मिळेल. या पॅकची व्हॅलिडेटी 28 दिवसांपर्यंत असणार आहे. तर 344 रुपयांच्या पॅकवर वोडाफोनच्या सर्व मोबाइल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल फ्री असणार आहे. तसेच नॅशनल रोमिंग फ्री असणार आहे. तसेच यूजर्सला 1 जीबी 4जी डेटा मिळेल.
वोडाफोनचे चीफ कमर्शियल ऑफिसर संदीप कटारिया यांनी सांगितलं की, 'आम्ही नुकतंच देशभरात नॅशनल रोमिंगवर फ्री इनकमिंग कॉल केलं आहे. आता या अनलिमिटेड कॉलिंग प्लानसोबत आथा आम्ही 20 कोटी प्रीपेड यूजर्सना बराच फायदा मिळू शकेल.'
एअरटेल आणि आयडियानं देखील 150 रुपयात आणि 350 रुपयात फ्री प्लान लाँच केले आहेत. जे फक्त प्रीपेड यूजर्ससाठी आहेत.
दरम्यान, रिलायन्स जिओनं देखील 149 रुपयांचा प्लान सुरु केला आहे. यामध्ये देशभरात अनलिमिटेड कॉलिंग आणि 300MB डेटा मिळेल. पण त्यासाठी तुमच्याकडे 4जी हँण्डसेटची गरज आहे. तर एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाच्या प्लानसाठी ४जी स्मार्टफोनची गरज नाही.
सध्या टेलिकॉम बाजारात जिओला टक्कर देणं सुरु आहे. पण पोस्टपेड यूजर्ससाठी काही खास ऑफर आलेल्या नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement