Washing Machine : पावसाळ्यात 'अशी' घ्या ‘वॉशिंग मशीन’ची काळजी; फॉलो करा सोप्या टिप्स...
Washing Machine Tips : वॉशिंग मशीनची काळजी कशी घ्यावी तसेच कपडे अगदी स्वच्छ धुवून निघण्यासाठी कोणते सोपे मार्ग आहेत यासाठी वाचा काही सोप्या टिप्स.
Washing Machine Tips : कडक उन्हाळा संपूर्ण आता पावसाळा सुरू झाला आहे. हवेतील गारवा वाढल्यामुळे पावसाळा हा ऋतू तसा दिलासादायकच आहे. मात्र, पावसाळ्यात गृहिणींसाठी मोठा प्रश्न पडतो तो न वाळलेल्या कपड्यांचा. अर्थात पाऊस म्हटलं की कपडे ओले होणे ही फार साहजिक बाब आहे. पावसाळ्यात कपडे वारंवार खराब होत असल्याने धुण्याचाही त्रास वाढतो. भारतात सुमारे एक तृतीयांश लोक वॉशिंग मशीनवर अवलंबून आहेत. यासाठी तुमची वॉशिंग मशीन टिकाऊ असणे फार गरजेचे आहे.
या ठिकाणी वॉशिंग मशीन्स, गोदरेज अप्लायन्सेसचे उत्पादन समूहप्रमुख, राजिंदर कौल (Rajinder Kaul) वॉशिंग मशीनची काळजी कशी घ्यावी तसेच कपडे अगदी स्वच्छ धुवून निघण्यासाठी कोणते सोपे मार्ग आहेत याच्या काही टिप्स दिल्या आहोत. त्या जाणून घेऊयात.
1. योग्य प्रमाणाच डिटर्जंट वापरा : वॉशिंग मशीनचा वापर करताना तुम्ही चांगल्या प्रकारचा आणि योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरत आहात ना, याची खात्री करून घ्या. यासाठी मशीनबरोबर मिळालेली माहितीपुस्तिका वाचा. यामध्ये तुम्हाला कपड्यांचा लोड पाहून किती प्रमाणात डिटर्जंट वापरायचे याची माहिती मिळेल.
2. वॉशिंग मशीन नीट स्वच्छ करा : अनेकदा घाईत कपडे धुत असताना डिटर्जंट आणि जड पाण्यामुळे मशीनवर अनावश्यक थर जमा होतो. त्यामुळे याचा परिणाम कपडे धुण्याच्या गुणवत्तेवर देखील होतो. परिणामत: मशीनमध्ये दुर्गंधी येऊ लागते. यासाठी वॉशिंग मशीनची खास क्लिनिंग पावडर वापरून डिटर्जंटचे डाग काढून टाकावे. यासाठी मशीनमध्ये कपडे न घालता किंवा ‘टब क्लीन मोड’ वापरून मशीन अशा प्रकारे आतून स्वच्छ करता येते. ही प्रक्रिया दर महिन्याला करावी.
3. दुर्गंधी टाळा : घामाचे कपडे दिवसभर वापरून अर्थात त्या कपड्यांना दुर्गंधी येणे साहजिकच आहे. हेच कपडे मशीनमध्ये घातल्याने त्यामध्येही घाण वास येऊ लागतो. यासाठी नेहमी कपडे धुवून झाल्यानंतर मशीनचे झाकण उघडे ठेवावे. यामुळे मशीन सुकते आणि दुर्गंधी निघून जाते. तसेच मशीनच्या कडेला नीट पुसून घ्यावे. यामुळे बुरशी जमा होत नाही.
4. जंतुनाशक पर्याय निवडा : बेडशीट, खूप घाण झालेले कपडे, घराबाहेर वापरलेले आणि पावसाच्या पाण्याने, चिखलाने बरबटलेले कपडे धुताना वॉशिंग मशीनमधील जंतूनाशक हा पर्याय वापरा. याचे सेटिंग वॉशिंग मशीनमध्ये उपलब्ध असते. त्याचा वापर करा.
5. कपडे धुण्याचे योग्य नियोजन करा : अनेकदा घाईच्या गडबडीत आपण जे मिळतील ते कपडे मशीमध्ये टाकतो. त्यामुळे मशीन ओव्हरलोड होते. मशीन ओवह्रलोड झाल्यामुळे ती जास्त प्रमाणात ऊर्जा वापरते. यासाठी मशीन ओव्हरलोड होईल इतके कपडे टाकू नका. यासाठी तुम्ही मशीनचा इको-मोड वापरू शकता. यामुळे तुमचे वीज आणि पाणी दोघांचीही बचत होईल.
6. सर्व्हिस सेंटरमधून नियमित सर्व्हिसिंग करून घ्यावी : मशीन नीट सुरु राहावी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये तसेच उत्तम कपडे धुवून निघावेत यासाठी वेळोवेळी वॉशिंग मशीनची सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या :