एक्स्प्लोर
विराट कोहलीला मिळालं एक खास गिफ्ट!

नवी दिल्ली: टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला एक खास गिफ्ट मिळालं आहे. विराट कोहली फुटबॉलचा मोठा चाहता असून युरो कपमध्ये त्यानं जर्मनीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी विराटनं जर्मनीची 18 नंबरची जर्सी घातलेला फोटो ट्विटरवर शेअर केला होता. विशेष म्हणजे जर्मनीचा मध्यरक्षक टोनी क्रूस हा 18 क्रमांकाची जर्सी घालतो. त्यामुळे विराटनं शेअर केलेला फोटो पाहून टोनी क्रूसलाही आनंद झाला. टोनी क्रूसनं हा फोटो पाहिल्यानंतर विराटला एक खास गिफ्ट देण्याचं वचन दिलं होतं. आणि टोनीनं आपलं वचन पूर्ण करुन विराटला स्वत:ची स्वाक्षरी असलेली जर्मनीची जर्सी भेट म्हणून दिली. विराटनंही लगेचचं त्या जर्सीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान विराटनंही टोनी क्रूसला गिफ्ट देण्याचं वचन दिलं असून, त्यानं टोनी क्रूस आणि जर्मनीच्या संघाला युरो कपच्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Thank You @ToniKroos Sending a present for you as well. All The Best for the quarters ???? #FirstNeverFollows#Euro16pic.twitter.com/DPcY3sYpFn
— Virat Kohli (@imVkohli) June 27, 2016
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























