एक्स्प्लोर
गॅलक्सी J2 प्रो लाँच, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी

नवी दिल्लीः सॅमसंगने गॅलक्सी J2 प्रो हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत केवळ 9 हजार 980 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन स्नॅपडीलवर 26 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सॅमसंगने या फोनचं व्हर्जन गॅलक्सी J2 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. त्यानंतर भारतात हा नवा फोन आणला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी लाईटची रिंग देण्यात आली आहे. मोबाईलवर नॉटीफिकेशन येताच ही एलईडी स्क्रीन सूचना करते. गॅलक्सी J2 प्रोचे फीचर्सः
- रॅम क्लीनसाठी टर्बो स्पीड टेक्नोलॉजी
- 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
- 1.5GHz क्वाड कोअर प्रोसेसर
- 2 GB रॅम
- 16 GB इंटर्नल स्टोरेज
- 8/5 मेगापिक्सेल कॅमेरा
- 2600mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा























