एक्स्प्लोर
सॅमसंग गॅलेक्सी C9 प्रो लॉन्च, तब्बल 6 जीबी रॅम, 16 मेगापिक्सेल कॅमेरा
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोनप्रेमी ज्याची वाट पाहत होते, तो सॅमसंग गॅलेक्सी C9 प्रो अखेर लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 6 जीबी रॅम. हा स्मार्टफोन सध्या चीनमधील स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत सुमारे 31 हजार रुपये आहे.
या नव्या C9 प्रो स्मार्टफोनमध्ये 6 इंचाचा डिस्प्ले (1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन) आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 653 प्रोसेसर आहे. 6 जीबी रॅम या स्मार्टफोनचं आकर्षण असून, 64 जीबी इंटरल स्टोरेज देण्यात आला आहे. एसडी कार्डच्या सहय्याने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधाही आहे.
फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी स्मार्टफोनध्ये f/1.9 अपॅरचरसोबत 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेरा आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठीही हा स्मार्टफोन खास ठरणार आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य आहे.
उत्तम क्वालिटीच्या ऑडिओसाठी HiFi Codec देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग पे आणि NFC सपोर्टिव्ह आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 4G LTE, Type-C पोर्ट, जीपीएससारखे फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement