एक्स्प्लोर
कॅमेरा प्रमोशनसाठी गेट्टी इमेजचा वापर, सॅमसंगवर गंभीर आरोप
सॅमसंग कंपनीने आपला ‘गॅलेक्सी ए-8’ स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लॉन्च केला होता. ड्युअल कॅमेरा सेटअपचा सॅमसंगचा हा पहिला स्मार्टफोन होता. या स्मार्टफोनच्या प्रमोशनवरुन सध्या सॅमसंग कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नवी दिल्ली : ‘गॅलेक्सी ए-8’ स्मार्टफोनच्या कॅमेरा प्रमोशनसाठी गेट्टी इमेज वापरल्याचा गंभीर आरोप सॅमसंग ब्राझिलवर करण्यात आला आहे. ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन सॅमसंग ब्राझिलने हे फोटो शेअर केले होते. त्यानंतर कंपनीने फोटो डिलिटही केले होते.
सॅमसंग कंपनीने आपला ‘गॅलेक्सी ए-8’ स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लॉन्च केला होता. ड्युअल कॅमेरा सेटअपचा सॅमसंगचा हा पहिला स्मार्टफोन होता. या स्मार्टफोनच्या प्रमोशनवरुन सध्या सॅमसंग कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रमोशनसाठीचे फोटो इंटरनली क्लिक करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण फोटोबाबत वाद सुरु झाल्यानंतर सॅमसंग ब्राझिलने दिले. तसेच, ‘गॅलेक्सी ए-8’ स्मार्टफोनमधून प्रमोशनसाठी जे फोटो वापरण्यात आले होते, तेवढ्या क्वालिटीचे फोटो काढले जाऊ शकत नाहीत, अशी कबुलीही सॅमसंग ब्राझिलने दिली आहे.
ट्विटरवर एका युझरने गेट्टी इमेज आणि सॅमसंग ब्राझिलने प्रमोशनासाठी वापरलेला फोटो ट्वीट करत सॅमसंग ब्राझिलला टॅग केले आहे. त्यावरुन आता सोशल मीडियावर सॅमसंग कंपनीला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागते आहे.
‘गॅलेक्सी ए-8’चे फीचर्स काय आहेत?Quer enganar quem, @SamsungBrasil? pic.twitter.com/Xy7b2dsRcz
— Fᴇʟɪᴘᴇʀᴀs (@feliperas) August 16, 2018
- ड्युअल कॅमेरा सेटअप (16 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सेल)
- कॅमेऱ्याच्या दोन्ही सेन्सरमध्ये लाईव्ह फोकस फीचर, सेल्फ पोट्रेटची सुविधा
- बॅक कॅमेरा 16 मेगापिक्सेल
- 5.6 इंचाचा पूर्णपणे एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले
- ऑक्टा कोर Soc प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- 64 जीबी स्टोरेज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
