एक्स्प्लोर
रेनो क्विडची तुफान घोडदौड, आतापर्यंत दीड लाखांहून अधिक बुकिंग

मुंबई : सप्टेंबर 2015 मध्ये लॉन्च झालेली प्रसिद्ध हॅचबॅक करा रेनो क्विडने नवा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या कारने दीड लाखांहून अधिक बुकिंग्जचा टप्पा पार केला आहे. एंट्री लेव्हल हॅचबॅक लॉन्च करुन एक वर्षही पूर्ण झालेला नाही, तोच कारच्या एवढ्या बुकिंग झाल्यने कारची लोकप्रियता लक्षात येते. या कारसाठी 4 ते 6 महिन्यांची वेटिंग आहे. वेटिंग टाईम कमी करण्यासाठी कंपनीने रेनो क्विडचं प्रॉडक्शन प्रत्येक महिन्याला 10 हजार यूनिटपर्यंत वाढवण्यात आलं आहे. रेनो क्विड कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग, वन-टच लेन चेंज इंडिकेटर, पॉवर विंडो, इंफोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी, ऑक्स-इनपुट पोर्ट आणि स्पीड सेन्सिंग इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. कंपनीने या कारसोबत 50 हजार किलोमीटर/2 वर्षांपर्यंत मेन्टेनन्स पॉलिसी आणि 2 वर्षांपर्यंत रोड साईड असिस्टन्सही जाहीर केलं आहे. या कारची 98 टक्के निर्मिती भारतात तयार करण्यात आली आहे. 800 सीसी पेट्रोल इंजिन, 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्स्मिशनही या कारमध्ये देण्यात आले आहेत. इंजिन 54 बीएचपी पॉवर, 72 Nm टॉर्क देते. याशिवाय, प्रति लिटर 25.17 किलोमीटरचं मायलेज ही कार देते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























