एक्स्प्लोर
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन कसा असेल?
मुंबई : रिलायन्स जिओचा 4G फीचर फोन बाजारात येण्यासाठी सज्ज असल्याची माहिती आहे. FoneArena ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. FoneArena ने या फोनचा फोटोही शेअर केला असून हा जिओचा अपकमिंग 4G फीचर फोन असेल, असा दावा करण्यात आला आहे. शिवाय या फोनची किंमत 1200 रुपयांच्या आसपास असेल, असं बोललं जात आहे.
रिलायन्स जिओचा स्वस्त 4G फीचर फोन बाजारात येईल, अशी माहिती या महिन्याच्या सुरुवातीला समोर आली होती. या फोनची किंमत 1500 रुपयांपेक्षा कमी असेल असंही बोललं जात होतं.
फोनच्या फोटोनुसार यामध्ये कीपॅड आणि इतर फीचर फोनप्रमाणे डिझाईन देण्यात आल्याचं दिसत आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका रिपोर्टनुसार भारतात अजूनही 65 टक्के लोक फीचर फोनचा वापर करतात.
रिलायन्स जिओने आपल्या वेलकम ऑफरअंतर्गत सव्वा सात कोटी स्मार्टफोन युझर्स आपल्याशी जोडले आहेत. पण आता स्मार्टफोन न वापरणाऱ्या ग्राहकांनाही आकर्षित करण्यासाठी जिओने 4G फीचर फोन आणण्याची तयारी सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement