(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Recharge Plan : दर महिन्याला रिचार्जची कटकट नकोच; Jio, Airtel, Vodafone चे वार्षिक प्लान्स, कॉलिंग, एसएमएससोबतच अनेक सुविधा
Recharge Plan : दर महिन्याला रिचार्ज करण्याची कटकट सोडा. Jio, Airtel, Vodafone यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांचे वार्षिक प्लान्स एकदा पाहा.
Recharge Plan : जर तुम्ही रोज-रोज रिचार्ज करुन कंटाळला असाल तर तम्ही पूर्ण एक वर्षासाठी तुमचा फोन रिचार्ज करु शकता. Jio, Airtel आणि Vodafone-Idea यांसारख्या टेलिकॉम कंपन्या एका वर्षाच्या रिचार्ज प्लानसोबत अनेक खास फिचर्स आणि ऑफर्स युजर्सना देत आहेत. या प्लान्समध्ये तुम्हाला 365 दिवसांची व्हॅलिडिटी, डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येईल. जाणून घेऊया एक वर्षाची व्हॅलिडिटी असणारे बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लान...
Jio चा एक वर्षांचा रिचार्ज प्लान :
जियोचा 2121 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान आहे. ज्यामध्ये तुम्हाला 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डाटा म्हणजेच, पूर्ण एक वर्षासाठी 504GB डाटा मिळणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा मिळणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला जियो एप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
Vodafone-Idea चा एक वर्षांचा रिचार्ज प्लान :
Vodafone-Idea चा एक वर्षांचा रिचार्ज प्लान अवघ्या 1499 रुपये आणि 2399 रुपयांच्या दोन किमतींमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दोन्ही प्लान्सची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. 1499 रुपयांच्या प्लानमध्ये एकूण 24 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 SMS फ्री मिळणार आहेत. तसेच 2399 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1.5GB डाटा आणि 100 SMS ची सुविधा मिळणार आहे. दोन्ही प्लानमध्ये Vi Movies & TV Classic आणि Binge All Night Offer या ऑफर्स मिळणार आहेत. या प्लानमध्ये तुम्हाला विकेंड डाटा रोलओव्हरची सुविधाही मिळणार आहे.
Airtel चा एक वर्षांचा रिचार्ज प्लान :
Airtel मध्ये 1498 रुपयांचा वार्षिक प्लान मिळतो. या प्लानमध्ये तुम्हाला 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. प्लानमध्ये एकूण 24 GB डाटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 SMS फ्री मिळतात. तसेच दुसरा प्लान 2,498 रुपयांचा असून या प्लानमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी, डेली 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS फ्री मिळतात. दोन्ही प्लानमध्ये Free Hellotunes, Wynk Music, Airtel Xstream Premium आणि 30 दिवसांसाठी Prime Video सब्सक्रिप्शन युर्ससाठी दिलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
GB WhatsApp Update: जीबी व्हॉट्सअॅप काय आहे? त्याचा वापर कितपत सुरक्षित आहे? जाणून घ्या