Realme C33: Realme लवकरच लॉंच करणार नवा स्मार्टफोन, जाणून घ्या लीक फीचर्स आणि किंमत
Realme C33: कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात Realme C30 आणि Realme C35 बजेट फोन सादर केले आहेत.
Realme C33 : Realme लवकरच भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Realme C33 लॉन्च करू शकतो. कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात Realme C30 आणि Realme C35 बजेट फोन सादर केले आहेत. Realme C30 फोन 3GB पर्यंत रॅम आणि 64GB स्टोरेज सपोर्टसह येतो. आता रिअॅलिटी आपल्या बजेट सी सीरीजमध्ये Realme C33 फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
डिस्प्ले, बॅटरी आणि प्रोसेसरची माहिती समोर
लीक झालेल्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून रिअॅलिटीच्या या आगामी बजेट फोनच्या डिस्प्ले, बॅटरी आणि प्रोसेसरची माहिती समोर आली आहे. हा फोन 3GB RAM + 32GB, 4GB RAM + 64GB आणि 4GB RAM + 128GB अशा तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घ्या
Realme C33 ची वैशिष्ट्ये
-Realme C33 मध्ये 6.6-इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
-हा फोन Unisoc प्रोसेसर सह येऊ शकतो.
-Realme C33 मध्ये 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच, या फोनमध्ये 4GB पर्यंत रॅम सपोर्ट करता येईल.
-Realme चा हा बजेट फोन Android 11 वर आधारित Realme UI R Edition सह येऊ शकतो.
-Realme C33 फोनच्या कॅमेर्याबद्दल जास्त माहिती मिळालेली नाही. तथापि, हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च केला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे.
-Realme C33 मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे.
Realme c33 ची किंमत
Realme C33 सॅंडी गोल्ड, एक्वा ब्लू आणि नाईट सी कलरमध्ये ऑफर केला जाऊ शकतो. असा अंदाज आहे की भारतात Realme C33 ची किंमत सुमारे 14,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. त्याच वेळी, अलीकडेच लॉन्च झालेल्या Realme C35 ची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होते, जी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि Amazon वरून सहजपणे खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये Unisoc प्रोसेसर, IPS LCD पॅनल आणि 5000mAh बॅटरी सारखे फिचर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- स्वातंत्र्य दिनी Jio ची खास ऑफर; वर्षभरात 2.5GB डाटा अन् बरंच काही
- Independence Day 2022 : 75 व्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देण्यासाठी 'असे' डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टिकर्स
- Har Ghar Tiranga: पोस्ट ऑफिसमधून घर बसल्या खरेदी करा तिरंगा, फक्त 25 रुपये खर्च करावे लागतील