एक्स्प्लोर
देशातील सर्वात स्वस्त RDP थिनबुक लॅपटॉप लॉन्च

मुंबई : हैदराबादमधील आरडीपी कंपनीने आपला थिनबुक अल्ट्रा स्लिम लॅपटॉप लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 9 हजार 999 रुपये आहे. हा देशातील सर्वात स्वस्त लॅपटॉप असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा या लॅपटॉपची स्क्रीन 14.1 इंचाची असून, हा लॅपटॉपला मायक्रोसॉफ्ट आणि इंटेलच्या मदीतने तयार करण्यात आला आहे.
आरडीपी थिनबुकचं वजन 1.4 किलो असून, इंटेल एटम x5-Z8300 प्रोसेसर यामध्ये आहे. त्याचसोबत 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे. मायक्रोएसडीच्या सहाय्याने 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे.
14.1 इंच एवढी स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपचं रिझॉल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. 10,000 mAh क्षमतेची लीथियम-पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे.
या थिनबुकला हैदराबादमध्ये डिझाईन करण्यात आलं असून, तैवानमध्ये बनवण्यात आले आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
बातम्या
Advertisement
Advertisement
























