एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प
मुंबई: युरोपसह जगातील अनेक देशामध्ये कम्प्युटर व्हायरस हल्ला झाल्याचं वृत्त समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युरोप, अमेरिका, चीन आणि रशियासह अनेक ठिकाणचे कम्प्युटर ठप्प झाले आहेत. रेनसमवेयर असं या व्हायरसचं नाव आहे. ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्विस या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.
...म्हणून रेनसमवेयर व्हायरसचा हल्ला
इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा.
या सायबर हल्ल्यासाठी रेनसमवेयर नावाच्या व्हायरसचा वापर केला असल्याचं म्हटलं जात आहे. रेनसमवेयर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या.
हा व्हायरस कम्प्युटरमधील असणाऱ्या फाइल आणि व्हिडिओ इनक्रिप्ट करतो आणि पैसे दिल्यानंतर पुन्हा तुमच्या फाइल सुरु होतात. सुदैवानं हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे.
कम्प्युटर व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करावं?
तुमच्या सिस्टममध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अॅण्टी व्हायरस टाकून घ्या. तसेच अॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करा. तसेच तुम्ही तुमच्या कम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. कोणत्या ऑनलाईन साइटवरुन काही डाऊनलोड करण्याआधी पहिले हे पाहा की ती वेबसाइट नोंदणीकृत आहे का. तसेच तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा.
काय आहे रेनसमवेयर व्हायरस?
अनेक देशात रेनसमवेयर नावाच्या कम्प्युटर व्हायरसला सायबर हल्ल्यासाठी जबाबदर मानलं जातं. यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement