एक्स्प्लोर
Advertisement
PUBG Mobile Lite भारतात लाँच, 2 जीबी पेक्षा कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठी खास व्हर्जन
पबजी या मोबाईल गेमची भारतातील वाढती लोकप्रियता पाहता कंपनीने आणखी एक नवीन व्हर्जन लाँच केलं आहे. 2 जीबी पेक्षा कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठी हे खास व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे.
पबजी या मोबाईल गेमच्या कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठीच्या खास आवृत्तीचे भारतात लाँचिंग करण्यात आले आहे. PUBG Mobile Lite असं या नव्या व्हर्जनचं नाव असून 'गूगल प्ले स्टोअर'वर खेळण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी हा गेम उपलब्ध आहे. पबजी मोबाईलची वाढती लोकप्रियता बघून अधिकाधिक मोबाईल फोनवर खेळता येईल यासाठी 'पबजी मोबाईल लाइट'ची निर्मिती करण्यात आली आहे.
पबजी या मोबाईल गेमनं गेल्या काही महिन्यांत अनेकांना वेड लावले आहे. भारतात या गेमची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर असून दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. मात्र हा गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनमधील रॅम आणि मेमरी जास्त क्षमतेची लागत असे तसेच प्रोसेसरही चांगल्या दर्जाचा आवश्यक असतो. त्यामुळे 2 जीबी किंवा त्यापेक्षा कमी रॅम असलेल्या आणि 4 ते 8 जीबी मेमरी क्षमतेच्या स्मार्टफोन धारकांना हा गेम खेळण्यात अडचण येत असे.
या गोष्टींचा विचार करत पबजी गेमच्या या नव्या व्हर्जनचं लाँचिंग करण्यात आलं आहे. भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी अनेकांकडे प्राथमिक श्रेणीतले मोबाईल असतात, ही बाब लक्षात घेऊन या लाइट आवृत्तीची रचना करण्यात आली आहे. कमी क्षमतेचा रॅम असलेल्या उपकरणांवरही तो खेळता यावा, अशा प्रकारे या खेळाची रचना करण्यात आली आहे. पबजी मोबाइल लाइटमध्ये 60 खेळाडूंसाठी लहान नकाशा असून त्यामुळे पारंपरिक पबजीची शैली कायम ठेवताना 10 मिनिटांपर्यंत चालणारा वेगवान खेळ खेळण्याचा आनंद खेळाडूंना मिळेल. अवघ्या 400 एमबीचा इन्स्टॉलेशन पॅक आणि 2 जीबी रॅमपेक्षा कमी क्षमता असलेल्या उपकरणांवरही विनाअडथळा चालेल, अशा दृष्टीने केलेली खेळाची रचना यामुळे या आवृत्तीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या खेळाडूंना खेळाचा आनंद लुटता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement