वाय-फाय राउटरसाठी पॉवरबँक लॉन्च, मिळेल 5 तासांचा बॅकअप
Ambrane PowerVolt Router UPS: भारतीय कंपनी Ambrane ने Wi-Fi राउटरसाठी Powerbank लॉन्च केला आहे. कंपनीने या नवीन उत्पादनाचे नाव Ambrane PowerVolt Router UPS असे ठेवले आहे.
Ambrane PowerVolt Router UPS: भारतीय कंपनी Ambrane ने Wi-Fi राउटरसाठी Powerbank लॉन्च केला आहे. कंपनीने या नवीन उत्पादनाचे नाव Ambrane PowerVolt Router UPS असे ठेवले आहे. कंपनीच्या मते Ambrane PowerVolt Router UPS फक्त 30 सेकंदात इन्स्टॉल करता येतो. Ambrane पॉवरव्होल्ट राउटर यूपीएसमध्ये 6000mAh लिथियम आयन बॅटरी आहे. कंपनीने दावा केला की, यात पाच तासांचा बॅकअप मिळेल.
Ambrane PowerVolt Router UPS स्पेसिफिकेशन
Ambrane PowerVolt राउटर UPS 12V उपकरणांसह ऑपरेट केले जाऊ शकते. Ambrane च्या या पॉवर बँकेसोबत एलईडी इंडिकेटरही उपलब्ध आहे. यासह केबल बॉक्समध्ये तीन कनेक्शन दिले जातील. जे तुम्ही तुमच्या राउटरच्या पोर्टनुसार वापरू शकता. Ambrane पॉवरव्होल्ट राउटर यूपीएस फक्त 30 सेकंदात इन्स्टॉल केला जाऊ शकतो. कंपनीच्या दाव्यानुसार, Ambrane PowerVolt Router UPS हे पूर्णपणे मेड इन इंडिया उत्पादन आहे. याला पूर्णपणे भारतात डिझाइन करण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यांत ऑडिओ, स्मार्ट वेअरेबल आणि मोबाइल अॅक्सेसरीज रेंजमध्ये कंपनी अनेक उपकरणे लॉन्च करणार असल्याचे Ambrane ने म्हटले आहे.
Ambrane PowerVolt Router UPS ची किंमत
Ambrane PowerVolt Router UPS चे बॉडी प्लास्टिकने बनवण्यात आली असून याला भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. ही पॉवर बँक कंपनीच्या साईटवरून सहज खरेदी करता येते. कंपनीच्या साईटवर याची किंमत 999 रुपये आहे. इतर कोणत्याही ई-कॉमर्स साईटवर याच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :