OnePlus Nord 2T 5G आज भारतात लॉंच; 80W चार्जिंग MediaTek Dimensity सह खास फिचर्स, जाणून घ्या
OnePlus Nord 2T 5G : OnePlus Nord 2T 5G भारतीय बाजारपेठेत आज 1 जुलै रोजी शुक्रवारी लॉन्च करण्यात येणार आहे.
OnePlus Nord 2T 5G Launched : OnePlus Nord 2T 5G भारतीय बाजारपेठेत आज 1 जुलै रोजी शुक्रवारी लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा फोन जुलैच्या पहिल्या दिवशी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता लॉंच केला जाईल. जाणून याच्या किंमतीबद्दल , फिचर्स आणि बरंच काही..
OnePlus Nord 2T 5G किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन दोन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आला आहे. त्याचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह देण्यात आला आहे. त्याची किंमत 28,999 रुपये आहे. त्याच वेळी, दुसरा प्रकार 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे, ज्याची किंमत सुमारे 33,999 रुपये आहे. हा फोन 1 जुलै रोजी लॉन्च करण्यात येत आहे आणि त्याची विक्री 5 जुलै रोजी होणार आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आले आहे.
मीडियाटेक डायमेन्सिटी
Nord 2 5G प्रमाणेच, OnePlus Nord 2T 5G मध्ये 90Hz AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरे आणि 4,500mAh बॅटरी आहे. तथापि, नवीन फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 1300 SoC दआहे आणि 80W जलद चार्जिंग आहे. Nord 2 5G मधील वरील दोन महत्त्वपूर्ण सुधारणा आहेत. ज्यात Dimensity 1200-AI SoC आणि 65W चार्जिंग होते. OnePlus Nord 2T 5G मोटोरोला एज 30, iQoo Neo 6, Poco F4 5G, Mi 11X, आणि Samsung Galaxy A33 5G च्या मोबाईलसोबत स्पर्धा करेल.
OnePlus Nord 2T 5G ची वैशिष्ट्ये
OxygenOS 12.1 वर आधारित Android 12 फोनमध्ये दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच रिफ्रेश दर 90Hz चा असेल. हा फोन HDR10+ ला सपोर्ट करेल. फोनच्या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे. हा फोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. यामध्ये 12 GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकते. याशिवाय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. फोनचा पहिला सेन्सर 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 लेन्स आहे. दुसरा 8-मेगापिक्सेल सोनी IMX355 लेन्स असेल आणि तिसरा 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर असेल. फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर दिला जाऊ शकतो. हा फोन 256GB पर्यंत स्टोरेजसह येऊ शकतो. फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 80W SuperVOOC वायर्ड चार्जिंगसह सुसज्ज असेल.
या बॅंकेची 1,500 ची सवलत
OnePlus Nord 2T 5G वर लॉन्च ऑफरमध्ये रु. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना Amazon, OnePlus.in, OnePlus Store अॅप, OnePlus Experience Stores, आणि इतर प्रमुख ऑफलाइन भागीदार स्टोअर्स, म्हणजे Reliance Digital, MyJio, Croma, Poorvika द्वारे खरेदी केल्यावर 1,500 ची झटपट बँक सवलत दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- Google Nest Cam : गुगल लवकरच भारतात लाँच करणार आपला नवीन सिक्युरिटी कॅमेरा; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- iphone 13 Discount Offer : iPhone 13 वर बंपर डिस्काउंट; पण मिळवाल कसा? जाणून घ्या सविस्तर
- Poco F4 5G : 4,000 रुपयांच्या बंपर सूटसोबत पोको F4 5G आजपासून विक्रीसाठी उपलब्ध