वनप्लस 6 टीच्या प्री बुकिंगला अॅमेझॉनवर सुरुवात
अॅमेझॉनवर वनप्लस 6 टी फोन बूक केल्यानंतर यूजर्सना इअरफोन आणि अॅमेझॉन पे बॅलेन्सची सुविधा मोफत मिळणार आहे.
मुंबई : वनप्लस 6 टी मोबाईल फोन अॅमेझॉन इंडियावर प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. वनप्सल 6 टीच्या या फ्लॅगशिपला 30 ऑक्टोबरपर्यंत बूक करता येणार आहे. फोन बूक केल्यानंतर यूजर्सना इअरफोन आणि अॅमेझॉन पे बॅलेन्सची सुविधा मोफत मिळणार आहे.
अॅमेझॉनच्या टुडेज डील आणि ऑल डीलच्या सेक्शनमध्ये वनप्लस 6 टी दाखवण्यात आला होता. त्यामुळे यूजरने हा फोन खरेदी केल्यास यूजरला 500 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. तसेच टाईप सी इअरफोनही मोफत मिळणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 30 ऑक्टोबरला नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाद्वारे भारतात हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे.
वनप्लस 6 टी फोनचा टीझर काही दिवसांपूर्वीच आला होता.
Check back in 24 hours for an exciting announcement. #OnePlus6T pic.twitter.com/MCQeDXkdAj
— OnePlus India (@OnePlus_IN) October 7, 2018
वनप्लस 6 टी फोनचे फीचर्स
- या फोनला 6.4 इंचचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटर नॉच आणि 9:9 च्या अॅस्पेक्ट रेशियोमध्ये असेल. - फोनला डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. तसेच डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुविधाही या फोनमध्ये असणार आहे. - या फोनमध्ये अॅन्ड्राईड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे, तर स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे. - फोनला 3700 mAhची बॅटरी देण्यात आली असून ज्यामध्ये डॅशचार्ज टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. - वनप्लस 6 टी फोनला ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रन्ट कॅमेरा फेस अनलॉक सपोर्ट करेल.