एक्स्प्लोर
'वनप्लस 5'ची प्रतीक्षा संपणार, भारतातील लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोनप्रेमींमध्ये 'वनप्लस 5'च्या लॉन्चिंगची मोठी उत्सुकता होती. अखेर 'वनप्लस 5' स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला आहे. 22 जून रोजी मुंबईत एका इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. 'वनप्लस 5'च्या लॉन्चिंगचा संपूर्ण इव्हेंट कंपनीच्या वेबसाईटवरुन लाईव्ह दाखवला जाणार आहे. 'वनप्लस 5'च्या लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये 23 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याचसोबत 'वनप्लस 5'मध्ये 5.5 इंचाचा स्क्रीन, 8 जीबी रॅम आहे. नोगट 7.1.2 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा स्मार्टफोन कंपनीच्या OxygenOS सिस्टमवर आधारित आहे. 6 जीबी रॅम/64 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम/128 जीबी मेमरी असे दोन व्हेरिएंट या स्मार्टफोनचे असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच क्वालकॉमने सांगितले की, वनप्लसस 5 हा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल, ज्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट असेल.
आणखी वाचा























