एक्स्प्लोर
नोकिया 5 ची विक्री 15 ऑगस्टपासून सुरु
एक महिन्यापासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या नोकिया 5 ची 15 ऑगस्टपासून विक्री सुरु होणार आहे. हा फोन ऑफलाईन खरेदी करावा लागेल.
मुंबई : जवळपास एक महिना प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असलेला नोकियाचा बजेट फोन नोकिया 5 अखेर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी करता येईल. तर नोकिया ब्रँडचे इतर फोन ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत.
नोकिया 5 भारतातील निवडक दहा शहरांमध्ये मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. यामध्ये मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली एनसीआर, चेन्नई, चंदीगड, जयपूर, कोलकता, लखनौ, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद और कालीकत या शहरांचा समावेश आहे.
नोकिया 6 हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनसाठी प्री बुकिंग अगोदरच सुरु करण्यात आली आहे. या फोनची विक्री 23 ऑगस्टपासून सुरु केली जाईल. नोकिया 5 हा फोन गेल्या महिन्यात 12 हजार 899 रुपयात लाँच करण्यात आला होता. यासोबतच नोकिया 6 आणि नोकिया 3 हे फोनही लाँच करण्यात आले होते.
नोकिया 5 ची लाँचिंग ऑफर
नोकिया 5 12 हजार 899 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन खरेदी करताना व्होडाफोन ग्राहकांना 149 रुपयांमध्ये 5 GB डेटा मिळेल. तीन महिन्यांसाठी ही ऑफर सुरु राहिल. ग्राहकांना 2500 रुपयांचं makemytrip.com चं कूपन मिळेल. यामध्ये हॉटेल बुकिंगवर 1800 रुपयांची आणि विमान तिकिटावर 700 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
नोकिया 5 स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- ऑक्टा कोअर प्रोसेसर
- 2GB रॅम
- 16 GB इंटर्नल स्टोरेज
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
भारतात एकाचवेळी नोकियाचे तीन स्मार्टफोन लाँच
नोकियाचे 3 स्मार्टफोन एकाचवेळी भारतात, अखेर लाँचिंगचा मुहूर्त ठरला!
नोकियाचे हे 3 स्मार्टफोन 13 जूनला भारतात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement