एक्स्प्लोर
नोकियाच्या अँड्रॉईड स्मार्टफोनचे फीचर आणि किंमत लीक
मुंबई: नोकिया काही महिन्यातच आपला नवा अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया D1C लाँच करु शकतं. या स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत पुन्हा एकदा लीक झाले आहेत. लीक रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनचे दोन व्हर्जन लाँच करण्यात येणार आहेत.
अँड्रॉईडवर आधारित नोकियाचा D1C चे दोन मॉडेल असतील. या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स वेगवेगळे असतील. 5 इंच डिस्प्ले असणार असून यात तर 2 जीबी रॅम आणि 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा यामध्ये असणार आहे. यामध्ये 5.5 इंच डिस्प्ले असणार आहे. 3जीबी रॅम आणि 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असू शकतो.
रिपोर्टसनुसार, नोकिया D1Cमध्ये 1.4GHz स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसरसोबत अॅड्रीनो 505 GPU असणार आहे. याच्या 2जीबी व्हेरिएंटची किंमत 10 हजार आणि 3 जीबी व्हेरिएंटची किंमत 13 हजार असण्याची शक्यता आहे.
पुढील 10 वर्षासाठी नोकियाचं लायसन्स असणारी कंपनी HMD ग्लोबलनं नुकतीच घोषणा केली आहे. HMD ग्लोबल ब्रॅण्डसोबत नोकिया ब्रॅण्ड पुन्हा एकदा लाँच करण्यात येणार आहे. HMD 2017साली आपला हा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. तसेच नोकियाचे ब्रॅण्ड फीचर फोन देखील लाँच करणार आहेत.
दरम्यान, हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतरच याचे नेमके फीचर समजू शकणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement