एक्स्प्लोर
तब्बल 23 मेगापिक्सेल कॅमेरा, नोकियाच्या नव्या फोनची माहिती लीक
मुंबई : नोकिया 3, नोकिया 5, नोकिया 6 आणि नोकिया 3310 नंतर नोकियाच्या आणखी एका स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. नोकियाचा हा महागडा आणि हायटेक फीचर्सचा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.
Pocketnow या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार नोकिया 8 या स्मार्टफोनमध्ये 23 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. शिवाय यामध्ये नोकिया अँड्रॉईड 8 आयओएस सिस्टम असेल, असंही बोललं जात आहे.
यापूर्वीही या स्मार्टफोनबाबत माहिती समोर आली होती. त्या माहितीनुसार या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर असेल, असं बोललं जात होतं. 16 मे रोजी लाँच होत असलेल्या HTC U या स्मार्टफोनमध्येही हेच प्रोसेसर वापरण्यात आलं आहे. तर सॅमसंग गॅलक्सी S8 मध्येही स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आहे. त्यातच आता नोकियाही या नव्या प्रोसेसरसह बाजारात उतरणार आहे.
यामध्ये 5.2 इंच आणि 5.5 इंच आकाराची स्क्रिन असणारे दोन व्हेरिएंट्स असतील. 4GB किंवा 6GB रॅम असणारे व्हेरिएंट्स असण्याची शक्यता आहे. तर स्टोरेज 128 GB ते 256 GB असेल, अशी चर्चा आहे.
नोकियाच्या या फोनच्या किंमतीविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत. काही रिपोर्ट्सनुसार 5.2 इंच स्क्रिन असलेल्या व्हेरिएंटची किंमत 37 हजार रुपये, तर 5.5 इंच स्क्रिन असलेल्या व्हेरिएंटची किंमत 42 हजार रुपये, असेल अशी माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement