New Mahindra Thar Review | महिंद्रा थारचे खास फिचर्स; जुन्या मॉडलपेक्षा अपडेटेड फिचर्सने सज्ज नवं मॉडेल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही कार लॉन्च करण्यास उशिर झाला. परंतु, आता ही कार आपल्या समोर आहे आणि आम्ही ही गाडी चालवली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहक आतुरतेने वाट पाहणाऱ्या या नव्या कारने अपेक्षा कितपत पूर्ण केल्या आहेत.
New Mahindra Thar Review : यंदाच्या वर्षी अनेक नव्या कार बाजारात आल्या परंतु, कोणत्याही कारने एवढी उत्सुकता ताणून धरली नाही जेवढी न्यू महिंद्रा थारने धरली होती. यामागे अनेक कारण आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे, या कारबाबत आपण सर्वचजण गेल्या अनेक वर्षआंपासून ऐकत होतो आणि ऑटो एक्सपोमध्ये ही कार पाहता आली नसल्यामुळे याबाबत सर्वांचीच उत्सुकता आणखी वाढली होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही कार लॉन्च करण्यास उशिर झाला. परंतु, आता ही कार आपल्या समोर आहे आणि आम्ही ही गाडी चालवली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहक आतुरतेने वाट पाहणाऱ्या या नव्या कारने अपेक्षा कितपत पूर्ण केल्या आहेत. जुन्या थार कारसोबत या गाडीची तुलना करायची झाली तर ही मोठी आणि प्रीमियम वाटते. परंतु, नव्या मॉडलमध्ये जुन्या क्लासिक जीप डिझाइनचा टचही देण्यात आला आहे.
नव्या थारमध्ये दोन व्हेरियंट्स LX आणि AX असणार आहेत. एएक्स हे व्हेरियंट्स अॅडव्हेंचर सीरीजच्या फॅन्ससाठी आहे. ज्यामध्ये 16 इंचांची चाकं, मागच्या बाजूला साइड-बेंच आणि अत्यंत कमी फिचर्स आहेत. LX किंवा लाइफस्टाइल सीरीजमध्ये जास्त फिचर्स आहेत, मागील बाजून फ्रंट-फेसिंग सीट आणि वॅकल्पिक 18 इंच व्हिल्स आहेत.
यामध्ये क्रूज कंट्रोल, एबीएससोबत ईबीडी, ड्युअल एअरबँग्स, हिल-होल्ड आणि ईएसपीसोबत रोलओव्हर देण्यात आलं आहे. कंपनीने आपल्या थारला मल्टीपल रूफ ऑप्शनसोबत सादर केलं आहे. यामध्ये हार्ड टॉप, सॉफ्ट टॉपसोबत पहिल्यांदाच कनवर्टिबल टॉपचा पर्यायही उपलब्ध आहे.
नव्या थारमध्ये 7 इंचाचा ड्रिजल रिस्टेंट टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जी अॅपल कार प्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटोला सपोर्ट करण्यात आला आहे. यामध्ये मागच्या सीटला आता फ्रंट फेसिंग देण्यात आलं आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे की, आता कारच्या सीटपासून ते फ्लोअरपर्यंत सर्वकाही वॉशेबल आहे. इंटिरियरच्या बाबतीत महिंद्राचा आतापर्यंतचं सर्वात बेस्ट लुक आहे.
नव्या महिंद्रा थारमध्ये दोन इंजिन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. एक 2.0 लीटर टर्बो-पेट्रोल मोटर (150 पीएस आणि 320 एनएम) आणि एक 2.2 लीटर टर्बो-डिझल मिल (130 पीएस आणि 320 एनएम) ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि 6 स्पीड ऑटोमॅटिकसोबत एक मॅन्युअल ट्रान्सफर केस (जो 2WD, 4WD आणि 4WD लो रेशियो मोड) देण्यात आला आहे.
एकूणच पाहायला गेलं तर थार ऑन रोड परफॉर्मंस ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. जुन्या थारच्या तुलनेत नवी थार प्रत्येक डिपार्टमेंटध्ये मोठा बदल आहे आणि आता तुम्ही नव्या थारसोबत डेली ड्रायव्हिंगसोबत विचार करू शकता. ऑफ रोडमध्ये नवी थार अत्यंत चांगली असून जुन्या थार प्रेमींच्या पसंतीस नक्की उतरेल. आम्हाला याचं डिझाइन, फिचर्स, ऑप रोक, इंप्रूव क्वॉलिटी आणि ऑन रोड परफॉर्मंन्स नक्की पसंत पडेल. दरम्यान, या कारमध्ये काही फिचर्स कमी आहेत.