एक्स्प्लोर

Facebook Fuel for India 2020 | मुकेश अंबानीनी फेसबुककडे व्यक्त केली 'ही' इच्छा

Facebook Fuel for India 2020 | मुंबईत बसून मला ऑस्ट्रेलियाच्या स्टेडिअमवर व्हर्च्युअल उपस्थित राहून क्रिकेट मॅच पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे अशी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी फेसबुकच्या मार्क झुकरबर्गकडे (mark zuckerberg) इच्छा व्यक्त केली.

मुंबई: रिलायन्स इन्डस्ट्रिजचे सर्वेसर्वा आणि क्रिकेट वेडे मुकेश अंबानी आपल्या व्यस्त कारभारातून क्रिकेटचा अस्वाद घेऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे आज जगभरच्या सर्व सुविधा आहेत पण ते आपल्या आवडत्या क्रिकेट सामन्याची लाईव्ह मॅच पाहू शकत नाहीत. मला मुंबईत बसून ऑस्ट्रेलियाच्या स्टेडिअमवर व्हर्च्युअल उपस्थित राहून लाईव्ह क्रिकेट सामन्याचा अस्वाद घ्यायचा आहे अशी इच्छा अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याकडे व्यक्त केली.

Facebook Fuel for India 2020 या कार्यक्रमाचे फेसबुकच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी मंगळवारी रिलायन्स इन्डस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि फेसबुकचे सस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यात चर्चा झाली. यादरम्यान फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यानी व्हर्च्युअल आणि ऑगमेन्टेड रियालिटीच्या ताकदीची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी झुकरबर्गकडे आपली इच्छा व्यक्त केली.

फेसबुकच्या युजर्सच्या मागणीवरुन फेसबुकने या आधीच भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामने फेसबुकवर दाखवले आहेत. त्याबद्दल मार्क झुकरबर्ग यांनी माहिती दिली. त्यानंतर मुकेश अंबानी म्हणाले की, "फेसबुकने अशा प्रकारची सुविधा सुरु केली आहे. याच्याही पुढे जाऊन भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचा व्हर्च्युएल आनंद घेता आला पाहिजे. मला मुंबईत बसून ऑस्ट्रेलियातील सामना तिथल्या स्टेडिअमवर व्हर्च्युअल उपस्थित राहून पहायचं आहे. आणि मला आशा आहे की फेसबुकच्या नेतृत्वाखाली एक दिवस ही गोष्ट शक्य आहे."

मुकेश अंबानींनी व्यक्त केलेल्या इच्छेला उत्तर देताना मार्क झुकगबर्ग म्हणाले की, "कदाचित आजपासून पाच किंवा दहा वर्षात माझे होलोग्राम व्हर्जन तुमच्या शेजारी बसले असेल. त्यावेळी आपण अशा प्रकारची चर्चा स्क्रीनवर न करता अधिक वास्तववादी पध्दतीने एकमेकांच्या शेजारी बसून करु. ही अविश्वसनिय कल्पना सत्यात येईल."

मार्क झुकरबर्ग पुढे म्हणाले की, "व्हर्च्युअल अॅन्ड ऑगमेंटेड रिअॅलिटीमध्ये तो व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या शेजारी असल्याचा भास होतो. त्यामुळे त्या व्यक्तीसोबत जोडण्याचा आणि काम करण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. मग तो व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असो त्याचा काही फरक पडत नाही. ही एक डिजिटल क्षेत्रातली क्रांतीच म्हणावी लागेल. म्हणून आम्ही या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे आणि त्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. या बद्दल मला खूप उत्सुकता आहे."

सध्या आपण जगात कोणत्याही ठिकाणी क्रिकेटचा सामना सुरु असो, त्याचा टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या आनंद घेऊ शकतो. पण व्हर्च्युअल आणि ऑगमेन्टेड रियालिटी ही कल्पना सत्यात आली तर आपण घरबसल्याही त्या क्रिकेटच्या मैदानात व्हर्च्युअली उपस्थित राहू शकतो आणि त्या सामन्याचा प्रत्यक्ष आनंद घेऊ शकतो. ही कल्पना डिजिटल क्षेत्रात एक क्रांतीच असेल.

मुकेश अंबानींच्या जिओ प्लॅटफॉर्म लि. (JPL) मध्ये फेसबुकने 10 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. त्याची एकूण किंमत ही 5.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. रुपयांच्या बाबतीत सांगायचं तर फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्म लि. (JPL)मध्ये 43,574 कोटी रुपये गुंतवले आहेत.

इंटरनेटची सुरुवात झाली तेंव्हा लोक एकमेकांना मेसेज करायचे. त्यानंतर त्याचा विकास होत गेला आणि लोक फोटो पाठवू लागले. आता 4G आणि 5G चा वापर करुन लोक आपले व्हिडिओ पाठवतात. भारतात 2021 सालच्या उत्तरार्धात 5G सेवा सुरु करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget