एक्स्प्लोर

Facebook Fuel for India 2020: मार्क झुकरबर्गला मुकेश अंबानी म्हणाले- भारताचा समावेश आता जगातल्या टॉप 3 अर्थव्यवस्थेत असेल

मंगळवार पासून Facebook Fuel for India 2020 या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात भारताच्या अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यात डिजिटलायझेशन आणि लहान उद्योगांची भूमिका या विषयावर फेसबुकच्या (Facebook) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि रिलायन्सच्या (Reliance) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात चर्चा झाली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला बुधवारी सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.

मुंबई: भारतात 'Facebook Fuel for India 2020' या कार्यक्रमाचं आयोजन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकनं केलं आहे. या कार्यक्रमात मंगळवारी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि रिलायन्सच्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात भारतीय अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी डिजिटलायझेशन आणि लहान उद्योग कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात या विषयावर चर्चा झाली.

जगाच्या टॉप 3 अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश असेल या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचा कारभार करताना आपली प्रमुख धोरणं, आराखडे आणि व्यावसायिक संबंध यांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "कोरोनाच्या संक्रमण काळातही भारत चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे. येत्या काही काळात जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश असेल. हा देश एक प्रमुख डिजिटल समाज होण्याचा मार्गावर आहे आणि याची दोरी युवकांच्या हातात असेल. भारताचा प्रति व्यक्ती उत्पन्न 1800-2000 अमेरिकन डॉलर्सवरुन वाढून 5000 अमेरिकन डॉलर्सवर पोहचेल."

मुकेश अंबानी यांनी मार्क झुकरबर्गशी बोलताना सांगितलं की, "जिओने डिजिटल कनेक्टिव्हिटी आणली आहे. WhatsApp Pay सोबत WhatsApp चॅटचा समावेश आहे, त्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. रिलायन्स आणि जिओ मार्टच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय जागतिक सुविधांचा लाभ घेऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने भारताच्या संपत्तीत वाढ होईल."

डिजिटल इंडिया मोहीमेला श्रेय रिलायन्स उद्योगसमुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारतातील डिजिटल सेवांच्या उपलब्धीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या मोहीमेला दिलं. त्याचबरोबर भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या परकीय गुंतवणुकीबद्दल झुकरबर्गचे आभार मानले.

दोन दिवस असेल कार्यक्रम मंगळवारी सुरु झालेला Facebook Fuel for India 2020 हा कार्यक्रम दोन दिवस चालेल. फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शरिल सँडबर्ग, इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी आणि WhatsApp चे प्रमुख विल कॅथकार्ट या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात बुधवारी सकाळी दहा वाजता होणार आहे.

हा आहे कार्यक्रमाचा उद्देश फेसबुक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहान यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितलं की, "आम्ही भारतात फेसबुकच्या काही गोष्टी शेअर करणार आहोत. ज्यामुळे आम्ही नेमकं काय करणार आहोत हे भारतीय युजर्सना सहज समजेल."

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Thane Mahanagarpalika Election 2026: ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
Embed widget