एक्स्प्लोर
'डेटागिरी'नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली.
!['डेटागिरी'नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस Mukesh Ambani Announced Jio Phone At Rupees Zero Latest Updates 'डेटागिरी'नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/21130854/ambani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन लाँच करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली.
रिलायन्स इंडस्ट्रिजची आज 40 वी सर्वसाधारण बैठक पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कंपनीच्या 40 व्या सर्वसाधारण बैठकीमध्ये जगातील सर्वात स्वस्त 4G फीचर फोन लाँच केला. हा फोन 15 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
तेव्हा डेटागिरी, आता डिजीटल फ्रीडम
रिलायन्स जिओने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जिओ सिम लाँच केलं होतं. जिओने दहा महिन्यातच जवळपास 12 कोटींपेक्षा जास्त ग्राहक मिळवले. जिओने विविध स्वस्तातील ऑफर्समुळे दूरसंचार क्षेत्रात नवीन क्रांती घडवली. मात्र डेटा उपलब्ध असेल तरीही देशात 4G फोनधारकांची संख्या अंत्यंत कमी आहे, हे रिलायन्सच्या लक्षात आलं. त्यामुळे रिलायन्सने जिओ फोन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला.
भारतीयांनी आतापर्यंत गांधीगिरी केली, मात्र आता डेटागिरी करतील, असा दावा अंबानी यांनी गेल्या वर्षी जिओ सिम लाँच करताना केला होता. प्रत्यक्षात तो दावा खराही ठरला. कारण भारत सध्या सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यावेळी मात्र अंबानींनी 'डिजीटल फ्रीडम'ची घोषणा केली. 15 ऑगस्ट रोजी हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल, या दिवसांपासून भारतीयांना 'डिजीटल फ्रीडम' मिळेल, अशी घोषणा अंबनींनी केली.
जिओ फोन कसा आहे?
रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
रिलायन्सची आज नवी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुकेश अंबानींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन.
जिओचा 4G VoLTE फीचर फोन
फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.
512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
जिओ फोन ग्राहकांच्या हातात कधी पडणार?
जिओचा फीचर फोन 15 ऑगस्टपासून उपलब्ध होईल. यासाठी 24 ऑगस्टपासून प्री बूकिंग करता येईल. त्यामुळे जो अगोदर बूक करणार त्यालाच हा फोन अगोदर हातात पडणार आहे. सप्टेंबरपासून हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
15 ऑगस्टपासून डिजीटल फ्रीडम
मुकेश अंबानींनी केलेल्या दुसऱ्या महत्त्वाच्या घोषणेमध्ये डेटा प्लॅनचाही समावेश आहे. 15 ऑगस्टला रिलायन्स तगडे डेटा प्लॅन घेऊन येणार आहे. त्याला रिलायन्सने डिजीटल फ्रीडम असं नाव दिलं आहे.
महत्वाचं या प्लॅननुसार जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
म्हणजेच 153 रुपये भरल्यानंतर सर्व काही अनलिमिटेड असेल, असा दावा रिलायन्सचा आहे.
''आगामी दोन वर्षात 99 टक्के फोनधारक 4G वापरतील''
मोबाईल डेटा हा डिजीटल इंडियाचा श्वास आहे. आज प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल फोन आणि परवडणारा डेटा उपलब्ध असणं गरजेचं आहे. मात्र दुर्दैवाने हे शक्य होत नाही. त्यामुळे जिओचा हा फोन यासाठी माईलस्टोन ठरेल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. येत्या दोन वर्षांमध्ये देशातील 99 टक्के फोनधारक 4G वापरतील, असंही अंबानी म्हणाले.
अंबानींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- रिलायन्स जिओने 10 कोटी ग्राहक 170 दिवसात जोडले. एका दिवसाला सरासरी 7 ग्राहक मिळाले. सर्वाधिक वेगाने ग्राहक मिळणारी रिलायन्स एकमेव कंपनी
- जिओ ग्राहक दररोज अडीच कोटी मिनिटं व्हॉईस कॉलिंग करतात.
- अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारत सर्वाधित डेटा वापरणारा देश बनला.
- जिओ धन धना धन ऑफर प्राईम ग्राहकांना यापुढेही मिळत राहणार
- जिओ लाँचिंगपूर्वी सर्वाधिक डेटा वापरणाऱ्यांच्या यादीत भारत 155 व्या स्थानावर होता. आता पहिल्या स्थानावर आहे.
- सर्वांना डेटा वापरता यावा यासाठी जिओ कनेक्टीव्हीटी, परवडणारा डेटा आणि फोन उपलब्ध करुन देणार
- जिओचं स्पीड नेटवर्क चांगलं आहे, येत्या 2 वर्षात देशातील 99 टक्के फोनधारक 4 G वापरतील
- इतर कंपन्यांना 2 G साठी अनेक वर्षे लागली, जिओने तीन वर्षात तेवढं नेटवर्क 4 G साठी तयार केलं.
- आता ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन दहा हजार कार्यालये आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सप्टेंबरपर्यंत सुरु करणार
- परवडणाऱ्या 4G फोनची किंमत साधारण 3 ते 4 हजार रुपये आहे, जे परवडणारं नाही. त्यामुळे जिओ फोन लाँच आहोत.
- भाषा अनेक, भारत एक, याप्रमाणे या फोनमध्ये 22 भाषा असतील.
- व्हॉईस कमांडिंग फीचर असेल.
- जिओचे सर्व अप्लिकेशन प्री लोडेड असतील.
- येत्या दोन वर्षात लोकेशन आणि स्थानिक आपत्कालीन सेवाही उपलब्ध असतील.
- डिजिटल पेमेंट करता येणार.
- देशातील 50 कोटी फीचर फोनधारकांना फायदा होईल.
- 15 ऑगस्टपासून देशाला डिजीटल फ्रीडम मिळेल.
- जिओ फोनवर अनलिमिटेड डेटा, व्हॉईस कॉलिंग मिळेल. यासाठी महिन्याला फक्त 153 रुपये मोजावे लागतील.
- जिओ फोन टीव्ही केबल- जो कोणत्याही टीव्हीला जोडता येईल. यासाठी 309 रुपयांचा रिचार्ज असेल.
- 15 ऑगस्टला हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असले. म्हणजे 24 ऑगस्टपासून प्री बुकिंग सुरु होईल आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात डिलीव्हरी देण्याचा प्रयत्न असेल.
- प्रत्येक आठवड्याला 50 लाख फोन तयार केले जातील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)