एक्स्प्लोर
मोटो E4, E4 प्लस स्मार्टफोनचं लवकरच भारतात लाँचिंग
मुंबई: लेनोव्हो ब्रँण्डचा मोटोरोला लवकरच भारतात आपला बजेट स्मार्टफोन Moto E4 आणि E4 प्लस लाँच करणार आहे. मुंबईतील रिटेलर महेश टेलिकॉमनं ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. पण त्यानंतर त्यांनी ते ट्वीट काढून टाकलं होतं.
लेनोव्होनं नुकतंच भारतात मोटो सी आणि मोटो सी प्लसचा अनावरण केलं. हे दोन्ही फोन ऑफलाइन उपलब्ध असून नतंर ते फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आले. अशाचप्रकारे मोटो E4 आणि मोटो E4 प्लस हे स्मार्टफोन देखील सुरुवातील ऑफलाइन उपलब्ध असतील. त्यानंतर ते ऑनलाइन उपलब्ध होतील.
मोटो E4 चे फीचर्स
5 इंच एचडी डिस्प्ले आणि रेझ्युलेशन 720x1080 पिक्सल
क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर
अँड्रॉईड 7.1 नॉगट
2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी
8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
2800 mAh बॅटरी
मोटो E4 प्लसचे फीचर्स
5.5 इंच एचडी डिस्प्ले
2 जीबी रॅम 16 जीबी आणि 32 जीबी इंटरनल मेमरी व्हेरिएंट
13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
5000 mAh बॅटरी
मोटो E4 ची किंमत 8500 रुपये तर E4 प्लसची किंमत 11600 असण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement