एक्स्प्लोर
Viral Video: फेसबुकवरील आतापर्यंतचा सर्वाधिक व्हायरल व्हिडीओ

मुंबई : अमेरिकेमधील कॅनडेस पायने या महिलेचा एक व्हिडीओ फेसबुकवर तुफान व्हायर झाला आहे. फेसबुकच्या इतिहासात हा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होणारा म्हणून नोंद झाली आहे. अमेरिकेतील एका महिलेने 19 मे रोजी फेसबुकवर हा एक मिनिट 24 सेकंदांचा लाईव्ह व्हिडीओ शेअर केला. हाव्हिडीओला आतापर्यंत 15 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. “It’s the simple joys in life” असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. 37 वर्षीय कॅनडेस पायने यांनी हा फनी व्हिडीओ फेसबुक लाईव्हवर पोस्ट केला होता. कॅनडेस या घराजवळ डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आपल्या मुलांसाठी गिफ्ट आणि कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. टेक्सासमध्ये राहणाऱ्या कॅनडेस यांनी यादरम्यान csubakka (फिल्मी कॅरेक्टर) मास्क खरेदी केला आणि मास्क परिधान करुन एक व्हिडी शूट करुन फेसबुकवर पोस्ट केला. हा व्हिडीओ 19 मे रोजी पोस्ट करण्यात आला होता. जवळपास 15 कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, 28 लाखांहून अधिक जणांना लाईक केला आहे. विशेष म्हणजे 33 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. पाहा व्हिडीओ -
आणखी वाचा























