Mivi चे तीन ऑडिओ प्रोडक्ट्स लाँच; 50 तासांच्या बॅटरी बॅकअपसह एकापेक्षा एक फिचर्सची पर्वणी
Mivi Audio Product : Mivi चे Duopods A550 आणि Duopods F70 earbuds 12mm ऑडिओ ड्रायव्हरला सपोर्ट करतात. याशिवाय, कॉलर क्लासिक PRO नेकबँडमध्ये 12mm ऑडिओ ड्रायव्हर आणि ब्लूटूथ 5.1 साठी सपोर्ट आहे.
Mivi Audio Product : Mivi ने आपल्या ऑडिओ पोर्टफोलिओचा विस्तार करत तीन नवीन ऑडिओ प्रोडक्ट्स लाँच केली आहेत. कंपनीनं भारतात Duopods A550 आणि Duopods F70 असे दोन नवीन ईअरबड्स लॉन्च केले आहेत. यासोबतच कॉलर क्लासिक पीआरओ (Collar Classic PRO) नेकबँडही सादर करण्यात आला आहे. दोन्ही ईअरबड्समध्ये 12mm ऑडिओ ड्रायव्हर सपोर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, कॉलर क्लासिक प्रो (Collar Classic PRO) नेकबँडमध्ये 13mm चा ऑडिओ ड्रायव्हर देण्यात आला आहे.
Mivi Duopods A550 आणि Duopods F70 चे स्पेसिफिकेशन्स
- Mivi चे Duopods A550 आणि Duopods F70 ईयरबड्समध्ये 12mm चे ऑडियो ड्रायव्हरचा सपोर्ट मिळतो.
- या ईअरबड्सला ब्लूटूथ 5.1 सोबत 10 मीटरच्या रेडियसपर्यंत वायरलेस कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
- ईयरबड्समध्ये USB टाईप-सी पोर्टसह फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
- कंपनीच्या वतीनं दावा करण्यात आला आहे की, ईअरपड्सला 1 तासात फुल चार्ज केलं जाऊ शकतं. त्यासोबतच ईअरबड्स 100 टक्के चार्ज झाल्यानंतर 50 तासांपर्यंत बॅकअप मिळतो.
- Duopods A550 आणि Duopods F70 ईअरबड्समध्ये Environmental नॉईज कॅस्नलेशन (ENC) सोबत क्वॉड माईकचा सपोर्ट मिळतो.
- Mivi Duopods A550 ला चार कलर ब्लॅक, ब्लू, मिंट ग्रीन आणि व्हाईट कलरच्या ऑप्शन्समझ्ये लॉन्च करण्यात आलं आहे. तसेच, Duopods F70 ला Beige,कोरल, ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आलं आहे.
Collar Classic PRO चे स्पेसिफिकेशन्स
Collar Classic PRO नेकबँडमध्ये 12mm ऑडियो ड्रायव्हर आणि ब्लूटूथ 5.1 चा सपोर्ट देण्यात आला आहे. नेकबँडला पाच कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू, ग्रीन, ग्रीन आणि रेडमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. Collar Classic PRO नेकबँडमध्ये 190mAh ची बॉटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 72 तासांचा प्लेबॅक टाईम मिळणार आहे. यामध्येही USB टाईप-सी पोर्टचा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच नेकबँडमध्ये Environmental नॉईज कॅस्नलेशन (ENC) चा सपोर्ट देण्यात आला आहे.
Mivi Duopods A550, Duopods F70 और Collar Classic PRO ची किंमत
Mivi च्या वतीनं लॉन्च करण्यात येणारे हे ऑडियो प्रोडक्ट ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुन अगदी सहज खरेदी केलं जाऊ शकतं. Duopods A550 आणि Duopods F70 ईयरबड्सची किंमत 1,599 रुपये आहे. तसेच, Collar Classic PRO नेकबँड 1,199 रुपयांच्या किमतींमध्ये खरेजी केलं जाऊ शकतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :