एक्स्प्लोर
मर्सिडीज बेंझची भारदस्त GLS लाँच, किंमत 8440000 !
![मर्सिडीज बेंझची भारदस्त GLS लाँच, किंमत 8440000 ! Mercedes Benz Gls Launched In India At Rs 80 40 Lakh मर्सिडीज बेंझची भारदस्त GLS लाँच, किंमत 8440000 !](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/18083029/Mercedes-Benz-GLS-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जर्मन लक्झरी कार मेकर कंपनी मर्सिडीज बेंजने आपली बहुप्रतिक्षीत भारदस्त कार अखेर भारतात लाँच केली आहे. मर्सिडीजने जीएलस हे मॉडेल भारतात लाँच केलं असून, त्याची किंमत 80.40 लाख रुपये आहे.
महत्त्वाचं म्हणजे या कारचं उत्पादन पहिल्यांदाच अमेरिकाबाहेर म्हणजेच भारतात होणार आहे.
'मर्सिडीझ बेंझ जीएलएस' हे 'मर्सिडीझ बेंझ जीएल'चं पुढचं मॉडेल आहे. 'मर्सिडीझ बेंझ जीएलएस'च्या बाह्यरुपात किरकोळ बदल करण्यात आला आहे. मात्र अन्य अंतर्गत भागातील बदलामुळे 'मर्सिडीझ बेंझ जीएलएस' एक शाही सफारीचा अनुभव देईल, असा विश्वास कंपनीला आहे.
या कारचा समोरील भागाला रॅडिएटर ग्रिल आणि डीएरएलस प्रणालीचे मल्टि बीम हेडलाईट बसवण्यात आले आहेत. त्याचा पुढील आणि मागील भागाला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. 'मर्सिडीझ बेंझ जीएलएस' ही 5130mm इतकी लांब, 1934mm रुंद आणि 1850mm उंच आहे.
'मर्सिडीझ बेंझ जीएलएस'मध्ये V8 बाय टर्बो इंजिन बसवण्यात आलं आहे, त्याची क्षमता 449 बीएचपी आहे. या इंजिनाला 9 स्पीड अटोमॅटिक टान्समिशनलेस करण्यात आलं आहे.
'मर्सिडीझ बेंझ जीएलएस' ही सात सिटर भारदस्त कार आहे. कारमध्ये आत टॅब्लेटसारखी 8 इंच स्क्रीन आहे. याशिवाय इंटरेअरमध्ये कमालीचे बदल करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)