एक्स्प्लोर
...म्हणून या कारची किंमत तब्बल 1.45 कोटी!
मासेराती या कार कंपनीने आपली पहिली एसयूव्ही कार लेवांटी लाँच केली आहे. स्टँडर्ड, ग्रांस्पोर्ट आणि ग्रांलूस्सो या तीन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे.
मुंबई : मासेराती या कार कंपनीने आपली पहिली एसयूव्ही कार लेवांटी लाँच केली आहे. स्टँडर्ड, ग्रांस्पोर्ट आणि ग्रांलूस्सो या तीन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत 1.5 कोटी रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते. या कारची स्पर्धा जॅग्वार एफ-पेस, पोर्श आणि बीएमडब्ल्यू एक्स 6 या कारशी असणार आहे.
व्हेरिएंट आणि किंमत
मासेराती लेवांटी स्टँडर्ड: 1,45,12,054 रुपये
मासेराती लेवांटी ग्रांस्पोर्ट: 1,48,63,774 रुपये
मासेराती लेवांटी ग्रांलूस्सो: 1,53,83,399 रुपये
या कारमध्ये 3.0 लीटरचं व्ही6 डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. ज्यामध्ये 275 पीएस पॉवर आहे. हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. या कारचा टॉप स्पीड 230 प्रतितास एवढा आहे. 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेण्यासाठी या कारला फक्त 6.9 सेंकदांचा वेळ लागतो.
या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग व्हील, अडेप्टिव्ह क्रूज कंट्रोल, स्टार्ट-स्टॉप फंक्शन, फॉरवर्ड कोलिशन वॉर्निंग, ऑटोमॅटिक ब्रेक असिस्ट सिस्टम, लॅन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाईंड स्पॉट अर्ल्ट, सराउंड-व्ह्यू कॅमेरा आणि पॉवर लिफ्ट टेलगेट हे फीचर देण्यात आले आहेत. यासारख्या हायटेक फीचरमुळेच या कारची किंमत तब्बल 1.45 कोटी एवढी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement