एक्स्प्लोर
मारुती सुझुकी, होंडा कंपनीच्या कारच्या किमतीत मोठी वाढ
10 जानेवारीपासूनच मारुती आणि होंडाच्या कारच्या विविध मॉडेल्सवर नव्या किमती लागू झाल्या आहेत.
मुंबई : यावर्षी तुम्ही मारुती सुझुकीची कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाट पडणार आहे. देशातील सर्वात मोठी कारमेकर कंपनी मारुती सुझुकी आणि होंडा यांनी गाड्यांच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे.
मारुती सुझुकीने 1 हजार 700 रुपयांपासून 17 हजारांपर्यंत किमती वाढवल्या आहेत. तर होंडाने सहा हजार रुपयांपासून 32 हजारांपर्यंत दर वाढवले आहेत.
10 जानेवारीपासूनच मारुती आणि होंडाच्या कारच्या विविध मॉडेल्सवर नव्या किमती लागू झाल्या आहेत. प्रशासकीय दर, कच्च्या मालाच्या किमती आणि वितरण खर्च वाढल्यामुळे या कारच्या किमती महागल्याचं सांगण्यात येत आहे.
मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किमतींची रेंज मोठी आहे. सर्वात स्वस्त हॅचबॅक अल्टो 800 ची किंमत 2.45 लाखांपासून सुरु होते, तर एस-क्रॉसची किंमत 11.29 लाख (एक्स-शोरुम दिल्ली) आहे.
होंडा कंपनीनेही 8 जानेवारीपासून भारतात तयार केल्या जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या किमती वाढवल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं. ही वाढ 6 हजार रुपयांपासून 32 हजार रुपयांपर्यंत आहे. होंडाची हॅचबॅक ब्रायोची किंमत 4.66 लाखांपासून सुरु होते, तर अॅकॉर्ड हायब्रिडची किंमत 43.21 लाखापर्यंत (एक्स-शोरुम दिल्ली) आहे.
दुसरीकडे, टाटा मोटर्सनी 1 जानेवारीपासूनच आपल्या गाड्यांच्या किमती 25 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. तर फोर्ड इंडियाने 4 टक्क्यांनी आपल्या कारचे दर वाढवले आहेत. ह्युंडाई, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, इसुझू, रेनॉल्ट कंपन्याही आपल्या किमती या महिन्यात वाढवणार आहेत, मात्र त्यांनी नव्या किमतींची घोषणा केलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement