एक्स्प्लोर
Advertisement
सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, ते मोदींकडून शिका : झुकरबर्ग
मुंबई : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या साडे 6 हजार शब्दांच्या फेसबुक पोस्टमधून ग्लोबल मिशन जगासमोर मांडलं. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही उदाहरण दिलं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडून कसं रहायचं, ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकावं, असं आवाहन झुकरबर्ग यांनी केलं आहे.
'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना सरकारची सर्व धोरणं आणि योजना फेसबुकवर शेअर करण्यास सांगितलं आहे. ज्यामुळे सरकारला लगेच जनतेचा फिडबॅक घेण्यासाठीही मदत होते,' असं उदाहरण झुकरबर्ग यांनी जगासमोर मांडलं आहे.
मतांपेक्षा दररोज जनतेच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. केवळ ठराविक काळातच म्हणजे निवडणुकीच्या काळातच असं न करता नेहमीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे. त्यातूनच जनतेशी संवाद होतो आणि तो नेता किती जबाबदार आहे, तेही समजतं, असं झुकरबर्ग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
झुकरबर्ग यांनी केनियातील एका गावाचंही उदाहरण दिलं. या गावातील सर्व नागरिक लोकप्रतिनिधींसोबत एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात असतात. भारतातही या गोष्टीचं महत्व चांगलंच माहित आहे, असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.
1960 च्या काळात टेलिव्हिजन एकमेव संवादाचं साधन होतं, तशीच भूमिका 21 व्या शतकात सोशल मीडियाची आहे, असं झुकरबर्ग यांनी म्हटलंय.
मार्क झुकरबर्ग यांची ग्लोबल मिशन संकल्पना वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement