एक्स्प्लोर

ट्विटरवरुनही आता लाईव्ह जा, कोणत्याही वेगळ्या अॅपशिवाय

मुंबई : ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटने प्रत्येक स्मार्टफोनधारकांना लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. साधारणपणे वर्षभरापासून ट्विटरने अधिग्रहित केलेल्या पेरिस्कोप या अॅपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रिमिंग म्हणजेच थेट प्रक्षेपणाची सुविधा यापूर्वीच होती. आता कोणत्याही त्रयस्थ अॅपशिवाय थेट ट्विटर कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही जे काही पाहात आहात ते आता थेट प्रक्षेपित करु शकता... तुम्हाला ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांच्या टाईमलाईनवर तुमचं थेट प्रक्षेपण प्रसारित होत राहील. https://twitter.com/video/status/809442927646650368 ट्वीटरने काल #GoLive या हॅशटॅगने जारी केलेल्या ट्वीटमधून लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली. तुम्हाला ट्विटरच्या मदतीने काहीही लाईव्ह करायचं असेल तर आपल्या स्मार्टफोनमधील ट्विटर अॅप ओपन करा. त्यानंतर नवीन ट्वीट टाईप करण्यासाठी क्लिक करा. तिथे असलेल्या कॅमेऱ्याच्या इमेजवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्टिल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेला लाईव्हचा पर्याय दिसेल. या लाईव्हच्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही थेट प्रक्षेपणासाठी सज्ज आहात. तुम्ही कशाचं थेट प्रक्षेपण करणार आहात, त्याविषयी थोडक्यात माहिती द्या आणि करा सुरुवात थेट प्रक्षेपणाला. ट्विटरच्या मालकीच्या पेरिस्कोप या लाईव्ह स्ट्रिमिंग अॅपच्या मदतीने लाईव्ह स्ट्रिमिंग करणं, हे तसं खूप लोकप्रिय झालं आहे. पॅरीसमध्ये झालेला अतिरेकी हल्ला हा पेरिस्कोप लाईव्हमुळेच संबंध जगाला समजला असं सांगितलं जातं. सोशल नेटवर्किंग मधील सर्वात मोठं नाव असलेल्या फेसबुकने यापूर्वीच आपल्या यूजर्सना लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तर डेस्कटॉप लाईव्ह स्ट्रिंमिंगचा पर्याय खूप आधीपासून असलेल्या आणि व्हिडिओचा सर्वात मोठा संग्रह असलेल्या यूट्यूबनेही आता स्मार्टफोनमधून लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय करुन दिली. मात्र भारतात अजून हा पर्याय यूट्यूब यूजर्सना मिळालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget