एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Koo (कू) अ‍ॅपचा एशिया पॅसिफिक क्षेत्रात सन्मान, पटकावलं सर्वात लोकप्रिय डिजिटल ब्रँड्समध्ये स्थान

Koo App : 'कू'ने नुकताच एशिया पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रातल्या लोकप्रिय 5 उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. 'अॅम्प्लिट्यूड'च्या 2021 च्या प्रॉडक्ट रिपोर्टमध्ये हे जाहीर करण्यात आले. 

Koo App : 'कू'ने नुकताच एशिया पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रातल्या लोकप्रिय 5 उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. 'अ‍ॅम्प्लिट्यूड'च्या 2021 च्या प्रॉडक्ट रिपोर्टमध्ये हे जाहीर करण्यात आले आहे. 'कू'हा भारतीय बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे.   हरेकाला आपल्या मातृभाषेत खुलेपणाने व्यक्त होण्याची संधी देणारा 'कू' हा एक खास मंच आहे. एपीएसी (APAC)  युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून या अहवालात मानांकन मिळवणारा 'कू' हा एकमेव सोशल मीडिया ब्रॅन्ड ठरला आहे. भारतीय ब्रॅन्ड्सपैकी दोनच ब्रॅन्ड्सना हा बहुमान मिळालेला आहे. 'कू'सोबतचा दुसरा ब्रॅन्ड आहे कॉइनसीडीएक्स (CoinDCX).

अ‍ॅम्प्लिट्यूडच्या वर्तन आलेखातला (बिहेविअरल ग्राफ) डाटा, आपलं डिजीटल जगणं घडवणाऱ्या नव्या आणि आगळ्यावेगळ्या डिजीटल उत्पादनांना समोर आणतो. हा रिपोर्ट 'कू'विषयी बोलताना म्हणतो, "हा एक आगळावेगळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो अस्सल भारतीयांना आपापल्या खास भाषांमध्ये व्यक्त होण्याची संधी देतो. कू 1 अब्जाहून जास्त भारतीयांचे आवडते ॲप बनण्यासाठी अगदीच तत्पर आहे." मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी अस्सल भारतीय बनावटीचे ॲप असलेल्या 'कू'चा प्रवास सुरू झाला तो मार्च 2020 मध्ये. नऊ भाषांमध्ये सेवा देत 'कू'ने केवळ 20 महिन्यांच्या अल्पकाळात दीड कोटी युजर्सची पसंती मिळवली आहे. दर्जेदार तंत्रज्ञान आणि कल्पक अनुवाद सुविधांमुळे 'कू' ने पुढच्या वर्षभरात 10 कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पूर्ण करणे अपेक्षित आहे.

'अ‍ॅम्प्लिट्यूड रिपोर्ट 2021'बाबत बोलताना 'कू'चे सहसंस्थापक आणि सीइओ अप्रमेय राधाकृष्णन म्हणाले, "कू'ने या सन्मान्य जागतिक अहवालात स्थान मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सोबतच 'कू' एशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वाधिक हव्याहव्याशा पाच डिजीटल प्रॉडक्ट्सपैकी एक म्हणूनही निवडले गेले आहे. आम्ही एकमेव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहोत, ज्याला एपीएसी (APAC)  युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून मानांकन मिळाले आहे. आम्ही अख्ख्या जगासाठी भारतातून एक ब्रॅन्ड घडवतो आहोत. त्यामुळे हा सन्मान आमच्यासाठी उल्लेखनीय आहे. हे मानांकन आम्हाला डिजीटल अवकाशातले भाषिक अडथळे ओलांडण्यासाठी प्रोत्साहन देईल. सोबतच यातून आम्हाला संस्कृती आणि भाषिक वैविध्यापलिकडे जात लोकांना एकमेकांशी जोडण्याची प्रेरणा मिळेल."

अ‍ॅम्प्लिट्यूड ही कॅलिफोर्नियातील प्रॉडक्ट अ‍ॅनॅलिटिक्स आणि ऑप्टिमायजेशन करणारी फर्म आहे. या अहवालात ब्रॅन्ड्सची निवड करताना वेगाने विस्तारणाऱ्या उत्पादनांची नोंद घेतली गेली आहे. त्यासाठी महिनाभरातील एकूण युजर्सच्या डेटाचे विश्लेषण केले गेले. अ‍ॅम्प्लिट्यूडने विशेषत: अशा कंपन्यांना विचारात घेतले, ज्या उच्च दर्जाचा डिजीटल अनुभव देतात. सोबतच जून 2020 ते जून 2021 या 13 महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी आधिकाधिक सक्रीय युजर्स मिळवत वेगवान वाढ दर्शवणाऱ्या या कंपन्या आहेत.   

काय आहे कू?

'कू'ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक सूक्ष्म-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, 'कू' विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी 'कू' एक मंच मिळवून देतो.

'अ‍ॅम्प्लिट्यूड'बद्दल

डिजिटल ऑप्टिमायझेशन क्षेत्रात अ‍ॅम्प्लिट्यूडने आजवर मुलभुत काम केले आहे. डेटाआधारित उत्पादन क्षेत्रातले अॅम्प्लिट्युडचे कौशल्य असामान्य आहे. डिजीटल उत्पादन क्षेत्रातल्या ट्रेंन्ड्सबाबतचे नेमके चित्र जाणून घेण्यासाठी अॅम्प्लिट्यूडला पर्याय नाही. याशिवाय डिजीटल फर्स्ट वर्ल्डमधील प्रॉडक्ट बिहेवियर आणि डिजीटल प्रॉडक्ट्सची धोरणं जाणून घेण्यासाठीही अॅम्प्लिट्यूड उपयोगी आहे.     

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget